ख्रिस्ताचे अनुसरण करणे预览

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

12天中的第4天

अनुसरण करणे म्हणजे वादळांस तोंड देणे

जीवनाची वादळे अत्यंत वास्तविक आहेत आणि कधी कधी अत्यंत अनपेक्षित! आरोग्य संकट,नात्यांची ताटातूट,आर्थिक मंदी,किंवा नोकरी गमाविणे तुमच्यासाठी अनपेक्षितपणे घडू शकते आणि तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. येशू तुम्हाला जीवनाच्या संघर्षांपासून आणि पराजयापासून मुक्त ठेवित नाही,पण त्याच्या सान्निध्याचे जे तुम्हाला कधीही सोडणार नाही तुम्ही शंभर टक्के आश्वासन प्राप्त करू शकता,तो एक क्षणभरही तुम्हाला वादळात सोडणार नाही.

अनेकदा,तुमच्या सभोवतालचे वादळ शांत करण्यापूर्वी परमेश्वर प्रथम तुमच्या आतील वादळ शांत करतो. जेव्हा आमचे अंतःकरण चिंताग्रस्त असते किंवा भारलेले असते तेव्हा आतील वादळ सामान्यतः पराकाष्ठेस पोहोचते. जेव्हा आपले विचार वेगाने चालत असतात आणि आपले मन गोंधळलेले आणि भ्रमित असते तेव्हा देखील आमच्या अंतःकरणात वादळे उठतात. जेव्हा आपण येशूसोबत पूर्ण शरणागतीत चालतो,तेव्हा तो अभिवचन देतो की आपल्या अंतःकरणाचे आणि मनाचे रक्षण करण्यासाठी त्याची शांती आपल्यासोबत असेल. तो अभिवचन देतो की त्याचा आनंद आपल्याठायी असेल आणि आपला आनंद पूर्ण होईल.

किती अद्भुत आश्वासन! वादळांत शांतता आणि आनंदाविषयी कोणी कधी ऐकले आहे का?तरीही,देवाची मुले म्हणून हा आपला वारसा आहे!

आपल्या सभोवताली वादळे घोंघावत असतांना,जेव्हा आपण त्याचे अनुसरण करतो,तेव्हा सर्व समर्थ परमेश्वराची उपस्थिती अधिक वास्तविक असते जो आपल्या शब्दाने त्यांस शांत करू शकतो. यात ज्ञानाद्वारे हे जाणून आम्हास मोठे सांत्वन प्राप्त झाले पाहिजे की वादळे आणि लाटा त्याच्या आज्ञेचे पालन करतात,भौतिक आणि आत्मिक क्षेत्रातही.

यापुढे वादळांनी तुम्हाला भेडसावता कामा नये कारण जो त्यांस शांत करतो तो तुमच्यासोबत आहे!

घोषणा: धीर धरा;मी जगाला जिंकले आहे.

读经计划介绍

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

जर तुम्ही हा विचार करीत असाल की खरोखर दररोज येशूचे अनुसरण कसे करावे तर ही बायबल योजना परिपूर्ण आहे. येशूला होय म्हणणे अर्थातच पहिले पाऊल आहे. पण जे होते, ते म्हणजे वारंवार हो म्हणण्याचा आणि त्याच्याबरोबर पाऊल टाकण्याचा आयुष्यभराचा प्रवास आहे.

More

相关题材的计划