ख्रिस्ताचे अनुसरण करणे预览

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

12天中的第2天

अनुसरण करण्यासाठी त्याग

येशूचे अनुसरण करताना काही प्रमाणात स्वतःचा नाकार करणे आणि त्याग करणे आवश्यक ठरतेे. येशूने त्याच्या अनुयायांना त्याचे अनुसरण करण्यांसाठी काय आवश्यक आहे हे सांगत असतांना आपल्या शब्दांची काटछाट केली नाही किंवा तो विषय सौम्य करण्याचा प्रयत्न केला नाही. तो म्हणाला की ज्यांस त्याचे शिष्य व्हायचे आहे,त्यांना स्वतःचा नाकार करावा लागेल आणि त्यांचा वधस्तंभ उचलून चालावे लागेल आणि दररोज त्याचे अनुसरण करावे लागेल. संपूर्ण जगाच्या पापांसाठी वधस्तंभावर खिळले जाण्यासाठी येशू आपला वधस्तंभ उचलून एका टेकडीवर जाण्यापूर्वीचा हा मार्ग होता.

तरी आपल्यापैकी प्रत्येकासाठी हा वधस्तंभ कसा दिसतो?

येशूसाठी,वधस्तंभ ही त्याला नेमून देण्यात आलेली कामगिरी होते. हे त्याच्यावर सोपविण्यात आलेले राज्याचे एक जड कार्य होते जे त्याने स्वेच्छेने स्वतःवर घेतले होते. त्याचे अनुसरण करणाऱ्या आपल्यापैकी प्रत्येकासाठी हे वेगळे नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतः देवाने दिलेले राज्याचे एक विशिष्ट कार्य आहे. आपण या जगात जन्म घेण्याआधीच ही कामे आम्हास सोपविण्यात आली आहेत. परंतु जेव्हा आपण येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकार करतो तेव्हा आपल्याला हे कार्य काय आहे हे प्रकट करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी पवित्र आत्म्याची मदत होते.

हे कार्य तुमच्या जीवनाचा हेतू बनेल आणि तुम्हाला असे दिसून येईल की तुमची बहुतांश ऊर्जा आणि आवड याकडे निर्देशित केली जाईल.

तुमचा वधस्तंभ वाहून नेत असताना येशूचे अनुसरण करण्याचा अर्थ सुखांचा त्याग करणे आणि ज्या गोष्टींसाठी तुम्हाला निर्माण करण्यात आले होते ते पार पाडत असताना त्याच्या प्रत पूर्णपणे आज्ञाधारक राहणे.

बरेचदा,आपल्या राज्याची कामगिरी पार पाडण्यासाठी ज्यांची आम्हाला सवय पडली आहे अशा सुखांचा आम्हाला त्याग करावा लागेल यासाठी की देवाची सेवा करण्यासाठी आम्हास स्वतंत्र राहता यावे. आपण आता ख्रिस्तामध्ये एक आहोत म्हणून आमच्या कामाचा जडपणाचे श्रेय देवाच्या गौरवाला जाते ज्याने आम्हास आता वेढले आहे. देवाचे गौरव जड आहे,आणि जेव्हा आम्ही आमच्या राज्याची कामगिरी स्वीकार करण्याची निवड करतो,तेव्हा हे सांगण्याची गरज नाही की आम्हाला बरेचदा त्याचा भार जाणवेल. त्याच्यासोबत आव्हाने आणि विजय असतील. या सर्व गोष्टीत,येशू आमच्यासोबत राहण्याचे वचन देतो!

घोषणा : येशू राज्याची जड कामगिरी पार पाडण्यात माझी मदत करतो.

读经计划介绍

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

जर तुम्ही हा विचार करीत असाल की खरोखर दररोज येशूचे अनुसरण कसे करावे तर ही बायबल योजना परिपूर्ण आहे. येशूला होय म्हणणे अर्थातच पहिले पाऊल आहे. पण जे होते, ते म्हणजे वारंवार हो म्हणण्याचा आणि त्याच्याबरोबर पाऊल टाकण्याचा आयुष्यभराचा प्रवास आहे.

More

相关题材的计划