ख्रिस्ताचे अनुसरण करणे预览

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

12天中的第8天

आपल्या संपूर्ण अस्तित्वासह अनुसरण करा

देवाच्या संपूर्णतेत आणि पूर्णत्वात त्याचे अनुसरण करण्यात आपल्याला जितके आरामदायक होण्याची गरज आहे तितकेच आपल्याला आपल्या संपूर्ण अस्तित्वासह त्याचे अनुसरण करण्याप्रत वैयक्तिक समर्पण देखील आवश्यक आहे. हे असे दिसते की आपण केवळ आपल्या शब्दांनी नव्हे तर विचार आणि कृतीने देखील येशूचे अनुसरण केले पाहिजे. याचा अर्थ हा की आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतःच्या आत खोलवर जाऊन खरोखरच त्याचे अनुसरण करण्याच्या वचनबद्धतेत कुठे उणीव आहे हे पाहावे. अनेकदा जे लोक येशूला पिढ्यानपिढ्या ओळखतात त्यांच्यासाठी योग्य वचने म्हणण्याची आणि योग्य मार्गाने प्रार्थना करण्याची प्रवृत्ती असते परंतु त्यांची अंतःकरणे देवापासून दूर असतात. कधी कधी जेव्हा आपण आपल्या विश्वासाच्या प्रवासात नवे असतो तेव्हा आपण संपूर्ण अंतःकरणाने तयार असतो आणि देव जेथे नेईल तेथे अनुसरण करण्यास तत्पर असतो,परंतु आपण ख्रिस्ताबरोबर जगण्यास सुरुवात केलेले नवीन जीवन टिकवून ठेवण्यासाठी आमच्या मनाचे नवीकरण झालेले नसते. म्हणून,हे खूप महत्वाचे आहे की,आपण पवित्र आत्म्यास विनंती करावी की आपण देवाचे अनुसरण करण्यासाठी कोठे संघर्ष करीत आहोत हे ओळखण्यात आणि त्याच्या नवचैतन्य निर्माण करणार्या उर्जेने आणि सामर्थ्याने आपल्या जीवनाच्या त्या भागाचे नवीकरण करण्यात त्याने आपली मदत करावी. आपण हे एकटे करू शकत नाही,परंतु ख्रिस्तासाठी,सर्व गोष्टी शक्य आहेत.

घोषणा: देवाचा आत्मा मला सर्व गोष्टींमध्ये मदत करेल.

读经计划介绍

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

जर तुम्ही हा विचार करीत असाल की खरोखर दररोज येशूचे अनुसरण कसे करावे तर ही बायबल योजना परिपूर्ण आहे. येशूला होय म्हणणे अर्थातच पहिले पाऊल आहे. पण जे होते, ते म्हणजे वारंवार हो म्हणण्याचा आणि त्याच्याबरोबर पाऊल टाकण्याचा आयुष्यभराचा प्रवास आहे.

More

相关题材的计划