दानीएल 2:20-22

दानीएल 2:20-22 MRCV

आणि दानीएल म्हणाला: “परमेश्वराचे नाव सदासर्वकाळ धन्यवादित असो; कारण ज्ञान आणि सामर्थ्य हे त्यांचेच आहे. ते समय व ॠतू बदलतात; ते राजांना पदच्युत करतात व इतरांना उंच करतात. शहाण्यांना तेच शहाणपण देतात, सुज्ञांना बुध्दीही देतात. गहन आणि गूढ रहस्य तेच प्रकट करतात; अंधारात काय आहे हे ते जाणतात आणि प्रकाश त्यांच्यामध्ये राहतो.