तेव्हा याहवेहने उत्तर दिले:
“हे प्रगटीकरण लिही
आणि सरळ स्वरुपात एका फळ्यावर लिही
म्हणजे घोषणा करणारा धावतांनाही वाचू शकेल.
कारण प्रगटीकरण त्याच्या नियोजित वेळेची वाट पाहते;
ते अंत समयाबद्धल बोलते
आणि ते खोटे ठरत नाही.
जरी ते विलंबित होते, तरी त्याची वाट पाहा;
ते निश्चितच येईल
आणि त्याला उशीर होणार नाही.