YouVersion Logo
Search Icon

यहोशुआ 16

16
एफ्राईम व मनश्शेह यांना मिळालेले वतन
1योसेफाच्या गोत्राला मिळालेल्या भागाची सुरुवात यार्देनेकडून होते, यरीहोच्या पूर्वेकडील झर्‍यापासून रानातून बेथेलच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत जाते. 2पुढे ती बेथेल (म्हणजे लूज) पासून अर्की लोकांची सीमा पार करून अटारोथपर्यंत गेली, 3पुढे ती पश्चिमेकडे यफलेटीच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोन व पुढे गेजेरपर्यंत उतरून भूमध्य समुद्रापर्यंत संपते.
4याप्रमाणे योसेफाचे वंशज मनश्शेह आणि एफ्राईम यांना वतन मिळाले.
5एफ्राईमच्या गोत्राची त्यांच्या कुळानुसार ही सीमा होती:
त्यांच्या वतनाची सीमा पूर्वेतील अटारोथ-अद्दार येथून बेथ-होरोनचा वरील भाग 6आणि पुढे भूमध्य समुद्रापर्यंत गेलेली होती. उत्तरेकडील मिकमथाथवरून वळून पुढे तानथ-शिलोहवरून पूर्वेकडे यानोहा येथवर गेलेली होती. 7नंतर पुढे ती सीमा यानोहापासून खाली वळून अटारोथ व नाराह येथवर जाऊन यरीहोस पोहोचून यार्देनातून आली होती. 8तप्पूआहपासून ही सीमा पश्चिम दिशेस कानाहा ओहोळावरून जाऊन भूमध्य समुद्रापर्यंत संपते. एफ्राईम गोत्रास त्यांच्या कुळानुसार मिळालेले वतन हे होते.
9मनश्शेहच्या वतनातील काही नगरे आणि त्यांची गावे सुद्धा एफ्राईमचे वतन म्हणून वेगळी करून ठेवण्यात आली होती.
10त्यांनी गेजेरात राहणार्‍या कनानी लोकांना घालवून दिले नाही; आजपर्यंत कनानी लोक एफ्राईम लोकांमध्ये राहत आहेत. परंतु लादून दिलेली मजुरीची कामे त्यांना करावी लागतात.

Currently Selected:

यहोशुआ 16: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in