इब्री 11:8-9
इब्री 11:8-9 MRCV
जेव्हा परमेश्वराने त्याला वारसाचे अभिवचन दिलेल्या देशात जाण्यास सांगितले, तेव्हा अब्राहामाने आपण कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही विश्वासाने आज्ञापालन केले. तो विश्वासाने त्या वचनदत्त देशात पोहोचला, तरीही तिथे एखाद्या परदेशी उपर्यासारखा तंबूतच राहिला. तसेच इसहाक व याकोब, ज्यांना परमेश्वराने हेच वारसाचे अभिवचन दिले होते, तेही पुढे तसेच तंबूत राहिले.