YouVersion Logo
Search Icon

प्रकटीकरण 7

7
इस्त्राएलना एक लाख चौरेचाळीस हजार लोक
1यानानंतर मी चार देवदूत पृथ्वीना चार कोपरावर ऊभा राहेल दखात, त्या पृथ्वीवरतीन अनं समुद्रवरतीन वारा वाहाले नको अनं कोणता बी झाडले लागाले नको म्हणीन पृथ्वीना चार वारासले आडाई राहिंतात. 2मी आखो एक देवदूतले सूर्योदयना दिशातीन वर चढतांना दखं, त्यानाजोडे जिवत देवना शिक्का व्हता; ज्या चार देवदूतसकडे पृथ्वीले अनं समुद्रले उपद्रव करानं काम सोपेल व्हतं त्यासले तो मोठा आवाजतीन बोलणा, 3“आमना देवना ज्या दास शेतस त्यासना कपाळवर आम्हीन शिक्का मारापावत पृथ्वीले, समुद्रले अनं झाडसले उपद्रव करू नका.” 4ज्यासनावर शिक्का मारामा वना त्यासनी संख्या मी ऐकी; इस्त्राएल लोकसना सर्व बारा वंशसपैकी एक लाख चौरेचाळीस हजारसवर शिक्का मारामा वना. 5प्रत्येक वंशपैकी बारा हजारसवर; यहुदा वंशपैकी बारा हजारसवर, रऊबेन वंशपैकी बारा हजारसवर; गाद वंशपैकी बारा हजारसवर; 6आशेर वंशपैकी बारा हजारसवर; नफताली वंशपैकी बारा हजारसवर; मनश्शे वंशपैकी बारा हजारसवर; 7शिमोन वंशपैकी बारा हजारसवर; लेवी वंशपैकी बारा हजारसवर; इस्साखार वंशपैकी बारा हजारसवर; 8जबूलून वंशपैकी बारा हजारसवर; योसेफ वंशपैकी बारा वंशपैकी बारा हजारसवर; बन्यामीन वंशपैकी बारा हजारसवर शिक्का मारामा वना.
मोठा समुदाय शुभ्र झगामा
9यानानंतर मी दखं तो सर्व वंश, जमात, राष्ट्रे अनं येगयेगळा भाषा बोलणारा यासनापैकी कोणले मोजता वना नही असा, शुभ्र झगा घालेल अनं हातमा खजुरना झाडन्या फांद्या लेयल, मोठी लोकसनी गर्दी राजासनसमोर अनं कोकरासमोर ऊभा राहेल माले दखायनी. 10त्या मोठा आवाजमा सांगी राहिंतात; “राजासनसमोर बशेल आमना देवकडतीन अनं कोकराकडतीन, तारण शे!” 11तवय राजासन, वडीलमंडळी अनं चार प्राणी यासना आजुबाजू सर्वा देवदूत ऊभा व्हतात, त्या राजासनसमोर उपडा पडी देवनी आराधना करीसन, 12बोलणात, “आमेन! उपकारस्तुती, गौरव, ज्ञान, धन्यवाद, सन्मान, सामर्थ्य अनं ताकद ह्या युगानुयुग आमना देवना शेतस! आमेन!”
13तवय वडील मंडळीपैकी एकनी माले ईचारं, “शुभ्र झगा घालेल ह्या कोण शेतस अनं कोठेन वनात?”
14 # मत्तय २४:२१; मार्क १३:१९ मी उत्तर दिधं, “माले नही माहित, गुरजी. तुमले माहित,” तो माले बोलणा, “मोठ्या संकटमातीन येतस त्या ह्या शेतस; यासनी आपला झगा कोकराना रंगतमा धोईसन शुभ्र करेल शे. 15यामुये त्या देवना राजासनसमोर शेतस; त्या अहोरात्र त्याना मंदिरमा त्यानी सेवा करतस अनी राजासनवर बशेल त्याना उपस्थितीमा त्यासनं संरक्षण करी. 16यानामुये त्या परत भूकेला असा व्हणार नहीत, अनं तहानेल व्हणार नहीत, त्यासले सूर्य किंवा कोणती बी कडक उष्णता जाळाऊ नही, 17कारण राजासनपुढे मध्यभागले राहणारा जो कोकरा त्यासना मेंढपाळ व्हई अनं तो त्यासले वाट दखाडीन जिवनना पाणीना झराजोडे लई जाई; अनी देव त्यासना डोयाना सर्व अश्रु पुसी टाकी.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in