YouVersion Logo
Search Icon

इब्री 3

3
येशु हाऊ मोशेपेक्षा श्रेष्ठ शे
1यामुये मना ईश्वासी भाऊ अनी बहिणीसवन, देवनी पाचारण करेलसवन, येशुवर ध्यान द्या! तो देवना प्रेषित अनी आमना ईश्वासना महायाजक शे. 2तो आपला नेमेलससंगे ईश्वासु व्हता “जसा मोशे बी देवना सर्व घराणाबद्दल ईश्वासु व्हता.” 3जस घर बांधणाराले घरपेक्षा जास्त सन्मान शे, तसं येशु बी मोशेपेक्षा जास्त सन्मानना योग्य मोजाई जायेल शे. 4प्रत्येक घर कोणतरी बांधेल ऱ्हास, पण सर्व वस्तु बनाडणारा देव शे. 5मोशे देवना घरमा सेवक या नातातीन ईश्वासु राहीना, अनी तो ज्या गोष्टी देव भविष्यमा सांगणार व्हता त्या गोष्टीसबद्दल त्यानी साक्ष दिधी. 6ख्रिस्त हाऊ ईश्वासु पुत्रना नातातीन परमेश्वरना घरना अधिकारी शे, जर आपण आपली आशाबद्दलना भरवसा अनं आपला अभिमान शेवटपावत भक्कम ठेवा तर त्यानं ते घर आपणच शेतस.
देवना लोकसले आराम
7यावरतीन, पवित्र आत्मा अस सांगस की, जर तुम्हीन त्यानी वाणी ऐकशात, 8तुमना पुर्वजसनी रानमा बंड करीसन देवनी परिक्षा दखीन स्वतःनं मन कठीण करं तसं तुम्हीन आपला मनं कठीण करू नका. 9परमेश्वर म्हणस, जरी चाळीस वरीस मी काय करं हाई दखं, तरी तुमना पुर्वजसनी मनी परिक्षा दखी अनी माले पारखं. 10त्यामुये त्या पिढीले संतापिन मी बोलनु, “यासना मनं कायम मनापाईन भटकत राहतस, अनी यासनी मन्या आज्ञासले मानं नही.” 11तवय मी रागमा शपथ वाहीसन बोलनु, या मना विसावाना जागावर प्रवेश करू शकावुत नही. 12भाऊ अनी बहिणीसवन, जिवत देवले सोडी देवानं ईतलं अईश्वासनं दुष्ट मन तुमनामा कोणच व्हवाले नको म्हणीसन जपीन ऱ्हा. 13जस शास्त्रमा सांगेल “आजना” दिन आपलाले लागु शे तसं एकमेकसले तुम्हीन प्रत्येक दिन धीर देवाना, याकरता की पापना फसवणुकघाई तुमनामातील कोणी कठोर व्हवाले नको. 14कारण जर आपण आपला सुरवातना आत्मईश्वास शेवटपावत भक्कम धरी ठेवा तर ख्रिस्तना भागीदार बनी जायेल शेतस. 15शास्त्रमा अस सांगेल शे; “आज जर तुम्हीन देवनी वाणी ऐकशात, तर आपला मनसले अस कठीण करू नका, जस की त्यासनी क्रोध देवाना येळले करं व्हतं. 16यामा सांगेल त्या देवनी वाणी ऐकीसन देवविरूध्द ‘बंड करनारा’ त्या कोण व्हतात? तर त्या मोशेद्वारा मिसरमातीन निंघेल सर्वाच नव्हतात का? 17‘देव कोणता लोकसवर चाळीस वरीसपावत संतापमा राहिना? काय त्यासनावर नही ज्यासनी पाप करं, ज्यासना प्रेतं रानमा पडी राहीनात. 18देवनी शप्पथ वाहीसन कोणले बोलना की, “तुम्हीन मना विश्रामस्थानमा प्रवेश करू शकावुत नही,” ज्यासनी आज्ञा मानी नही त्यासले की नही? 19तर अईश्वासमुये त्यासले वचननी भुमीमा प्रवेश करता वना नही अस आपले दखाई येस.

Currently Selected:

इब्री 3: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in