YouVersion Logo
Search Icon

प्रेषित 21

21
पौल यरूशलेमले जास
1मंग अस व्हयनं की, आमना त्यासनासंगे दुःखीत निरोप कार्यक्रम व्हवानंतर आम्हीन जहाजमा बठीन सरळ कोसा शहरले गवुत अनी दुसरा दिन रूदास अनं तठेन पातऱ्या आठे गवुत. 2नंतर पलिकडला फेनीकेस शहरले जाणारं जहाज भेटावर त्यामा बठीन आम्हीन निंघनु. 3मंग सायप्रस दखायनं तवय त्याले डावीबाजुले सोडीन आम्हीन सिरिया देशकडे जाईन सोरास शहरले उतरनुत, कारण तठे जहाजमाधला माल उतारना व्हता. 4अनी तठे काही ईश्वासु आमले भेटनात म्हणीसन आम्हीन तठे सात दिन राहीनुत, त्यासनी आत्माना प्रेरणातीन पौलले सांगं, “तु यरूशलेममा पाय ठेवु नको.” 5मंग अस व्हयनं की, त्या दिन जावानंतर आम्हीन तठेन निंघीन वाटले लागनुत, तवय बाया अनी पोऱ्या यासनी सर्वासनी बी आमले शहरना बाहेर पोहचाडं, तठे समुद्रना काठले आम्हीन गुडघा टेकिन प्रार्थना करी. 6एकमेकसना निरोप लेवानंतर आम्हीन जहाजमा बठनुत, अनी त्या आपला घर परत गयात.
7मंग आम्हीन सोरापाईन आमना जलप्रवास करानं थांबाडं, अनी प्तलमैसाले ईसन अनी ईश्वासु बंधुसले भेटीसन त्यासना आठे एक दिन राहीनुत. 8#प्रेषित ६:५; ८:५दुसरा दिन आम्हीन निंघीन कैसरियाले वनुत, अनी सुवार्ताना प्रचार करनारा फिलीप्प याना घर जाईन राहीनुत, हाऊ निवाडेल सात जणसपैकी एक व्हता. 9त्याले चार कुवाऱ्या पोरी व्हत्यात त्या देवना संदेश देवानं काम करेत. 10#प्रेषित ११:२८तवय आम्हीन बराच दिन राहीनुत तवय अगबस नावना एक संदेष्टा यहूदीया शहरतीन वना. 11त्यानी आमनाकडे ईसन अनी पौलना कमरबंद लिसन आपला हात पाय बांधीन सांगं, “पवित्र आत्मा अस म्हणस, ज्या माणुसना हाऊ कमरबंद शे त्याले यरूशलेममा यहूदी लोके अस बांधीसन गैरयहूदी लोकसना हातमा देतीन.”
12हाई ऐकीसन आम्हीन अनी तठला लोकसनी बी तु यरूशलेममा जावु नको, अशी पौलले ईनंती करी. 13तवय पौलनी उत्तर दिधं, “तुम्हीन रडीसन मना मनना खच्चीकरण करतस, हाई काय शे? मी नुसता बंधनमा पडाले नही, तर प्रभु येशुना नावकरता यरूशलेममा मराले बी तयार शे.”
14तो ऐकी नही राहीना हाई दखीसन आम्हीन गप्प राहीन बोलनुत, “प्रभुना ईच्छाप्रमाणे होवो.”
15काही दिन तठे रावानंतर आम्हीन आपली तयारी करीसन यरूशलेममा गवुत. 16आमनासंगे कैसरिया शहरमातला बराच शिष्य वनात, त्यासनी आपलासंगे सायप्रस शहरना म्नासोन नावना या जुना शिष्यले लई वनात, त्यासना घर आमले मुक्काम ऱ्हावानं व्हतं.
पौल याकोबले भेटस
17यरूशलेमले येवानंतर ईश्वासु बंधुजणसनी आमनं आनंदमा आगतस्वागत करं. 18मंग दुसरा दिन पौल आमनासंगे याकोबले भेटाले त्याना घर वना, अनी सर्व वडीलवर्ग बी तठे वना. 19तवय त्यानी त्यासले भेटीसन आपली सेवामातीन ज्या कामे देवनी गैरयहूदी लोकसमा करात त्या एक एक करीसन सविस्तर सांग्यात. 20हाई ऐकीसन त्यासनी देवनं गौरव करं, अनी त्याले सांगं, “हे भाऊ पौल, ज्यासनी ईश्वास ठेवा असा यहूदी लोकसमा कितला हजारो लोके शेतस, हाई तु दखस, त्या सर्व नियमशास्त्रना स्वाभिमान बाळगनारा शेतस. 21तुनाबद्दल त्यासले अस सांगामा येल शे की, तु गैरयहूदी लोकसमा राहणारा सर्व यहूदी लोकसले मोशेना नियमशास्त्रना त्याग कराले शिकाडस अनी आपला पोरसनी सुंता करानी नही अनी रोजना परीपाठप्रमाणे चालानं नही, अस बी सांगस. 22तर आते काय करानं? तु येल शे, हाई तर त्यासले कुठेन तरी माहीतच पडी. 23यामुये आम्हीन तुले जे सांगतस ते कर, नवस करेल असा आमनामा चारजण शेतस. 24त्यासले लिसन तु त्यासनासंगे शुध्द व्हवाना कार्यक्रममा सामील व्हय, अनी त्यासनी मुंडन कराले पाहिजे म्हणीसन त्यासना खर्च तु कर, म्हणजे तुनाबद्दल जे सांगामा येल शे, त्यामा काहीच अर्थ नही शे उलट तु स्वतः नियमशास्त्र पाळीन व्यवस्थानुसार वागस हाई सर्वासले समजी. 25#प्रेषित १५:२९पण ज्यासनी ईश्वास ठेयल शे असा गैरयहूदी लोकसबद्दल आम्हीन निर्णय लिसन लिखीन धाडेल शे की, त्यासनी मुर्तिले अर्पण करेल पदार्थ, रक्त, गळा दाबीन मारेल प्राणी अनी व्यभिचार यापाईन स्वतःले संभाळानं.”
26तवय पौल त्या माणससले लिसन दुसरा दिन त्यासनासंगे शुध्द व्हईसन मंदिरमा गया अनी ज्या दिनले त्यासनामझारना एक एक करता अर्पण करानं सुरू व्हयनं ते अर्पणे संपाना दिनपावत शुध्दताना दिन आपण पुरा करी राहिनुत अस त्यानी दखाडं.
मंदिरमा पौलले अटक व्हस
27पुढे त्या सात दिन पुरा व्हणारच व्हतात, तवय आशिया प्रांतना यहूदी लोकसनी त्याले मंदिरमा दखीन सर्व लोकसनी गर्दीले भडकाई दिधं अनी पौलले धरी लिधं. 28अनी वरडीन बोलनात, “अहो इस्त्राएल लोकसवन, आमले मदत करा! आपला लोके, मोशेनं नियमशास्त्र अनी हाई मंदिर यासना विरोधमा जो सर्वीकडे सर्वासले शिकाडस तो हाऊच शे, आखो यानी गैरयहूदी लोकसले या मंदिरमा आणीन हाई पवित्रस्थानले अपवित्र करी टाकेल शे!” 29#प्रेषित २०:४यासनी इफिस शहरना राहणारा त्रफिम नावना माणुसले पहिले पौलसंगे दखेल व्हतं, त्याले यानी मंदिरमा आनं व्हई, अस त्यासले वाटनं व्हतं.
30सर्व शहर भडकी ऊठनं अनी सर्व लोके पयत ईसन एकत्र व्हयनात, अनी त्यासनी पौलले धरीसन मंदिरमातीन वढीन बाहेर काढं, अनी लगेच मंदिरना दरवाजा बंद करी दिधात. 31मंग त्या जवय त्याले मारी टाकाले दखी राहींतात तवय रोमी पलटनना सेनापतीले बातमी लागनी की, सर्व यरूशलेममा गडबड व्हई जायेल शे. 32तवय लगेच तो शिपाई अनी अधिकारीसले लिसन त्यासनाकडे खाल पयत गया, सेनापती, शिपाई अनी अधिकारी यासले दखीन त्यासनी पौलले मारानं थांबाडं. 33तवय सेनापतीनी जोडे ईसन पौलले धरं अनी दोन साखळ्यासघाई त्याले बांधाना आदेश दिधा, मंग हाऊ कोण अनी यानी काय करं? अस त्यानी ईचारं. 34तवय लोकसमातीन कोणी काय, तर कोणी काय काय वरडत राहीनात, त्या गोंधळमा त्याले नेमकं काय व्हयनं हाईच समजनं नही, म्हणीसन त्यानी त्याले किल्लामा लई जावाना आदेश दिधा. 35त्या त्याले पायऱ्यासवर लई वनात तवय अस व्हयनं की, शिपाईसनी पौलले उचली लिधं अनी लई गयात कारण पुरी गर्दी भडकीच राहींती. 36अनी लोकसनी गर्दी मांगे चाली राहींती, अनी “ह्याले मारी टाका!” अस वरडी राहींती.
पौल स्वतःना बचाव करस
37मंग पौलले किल्लामा लई जाणार इतलामा त्यानी सेनापतीले सांगं की, “माले तुमनासंगे काही बोलानी संधी भेटी का?” तो बोलना, “ग्रीक भाषा तुले येस का? 38ज्या मिसरी माणुसनी काही दिन पहिले बंड करीसन चार हजार बंडखोरसनं जंगलमा नेतृत्व करनारा, तो तुच शे ना?”
39तवय पौलनी सांगं, “मी प्रसिध्द किलिकिया प्रदेशमाधलं तार्स शहरना यहूदी माणुस शे, मी तुमले ईनंती करस की, लोकससंगे बोलानी माले परवानगी द्या.”
40त्यानी परवानगी देवानंतर पौलनी हातघाई लोकसले इशारा करा अनी सर्व शांत व्हवानंतर तो त्यासनासंगे इब्री भाषामा अस बोलना;

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in