YouVersion Logo
Search Icon

१ पेत्र वळख

वळख
१ पेत्र, हाई पुस्तक प्रेषित पेत्र यानी लिखेल व्हतं. पेत्रनी हाई सांगीसन आपला पत्रनी सुरवात करी की, तो कोण शे अनी कोणाकरता लिखी राहीना. त्यानी गैरयहूदी म्हणेल सर्व ख्रिस्ती लोकसले पत्र धाडीसन सुचना कऱ्यात. १:१; १:१७ अनी २:११ त्यानी आपला वाचकसले असा बराचदाव संदर्भ दिधा, कारण त्या येगयेगळा दिशामा पसरेल व्हतात. कारण हाई पत्र थोडफार इफिसकरसले पौलनी लिखेल पत्रसनामायक शे. बराच लोकसना असा ईश्वास शे की, १ पेत्र हाई पुस्तक ख्रिस्तना जन्मनंतर जवळपास ६५ वरीस नंतर इफिसना लोकसले लिखामा वनं. पेत्रनी रोमले पत्र लिखं त्याले तो बाबेल म्हणे. ५:१३
पेत्र सांगस की, त्यानी तुमले प्रोत्साहन देणारं अनी हाईच देवनं खरं तारण शे हाई सिध्द कराकरता हाई पत्र लिखेल शे. ५:१२ १ पेत्र २:११; ३:७; अनं इफिस ५:१८–६:९; कलस्सै ३:१८; ४:६; यासनामा बरीच समानता शे. या सर्व तीन भागसमा कौटुंबिक नातेसंबध अनी अधिकाऱ्यासनी आज्ञा पाळानी सुचना देवानी अस तो सांगस. तो ईश्वासनारासले दुःखना काळमा त्यासले प्रोत्साहन दिधं की शेवटना काळ जवळ येल शे. ४:१
रूपरेषा
१. पेत्र स्वतःनी वळखं करी देस, अनी त्याना वाचणारासले संबोधित करस. १:१-२
२. मंग तो देवना तारणकरता आभार मानस अनी त्याना त्यासना जिवनकरता काय अर्थ शे, हाई सर्वासले सांगस. १:३–२:१०
३. पुढे तो ईश्वास ठेवस की, जगमा चांगलं कसं ऱ्हावानं अनी नवरा अनं बायको अनी दास अनं मालक यासना येगयेगळा संबधले संबधीत करस. ४:१२–५:११
४. नंतर जवय पीडीत लोकेसले त्रास देवामा वना, तवय त्यासले धीर दिसन प्रोत्साहन करस. ४:१२–५:११
५. त्यानानंतर त्यानी आपला पत्रनी समाप्ती करी. ५:१२-१४

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in