YouVersion Logo
Search Icon

१ पेत्र 3

3
नवरा अनं बायको
1 # इफिस ५:२२; कलस्सै ३:१८ बायासवनं, तुम्हीन तसच आपआपला नवरासना अधीन रहा; यानाकरता की कोणी वचनले अमान्य राही, 2कारण त्या दखतीन तुमनी वागणुक कशी शुध्द अनी भक्तीपूर्ण शे. 3#१ तिमथ्य २:९तुमनी शोभा केससनं गुंफणं, सोनाना दागीना घालणं, किंवा कपडा घालणं यासनाघाई बाहेरतीन आणेल नही ऱ्हावाले पाहिजे; 4तर जो नम्र अनं शांत आत्मा देवना दृष्टीतीन बहुमूल्य शे त्यानी, म्हणजे अंतःकरणमाधली जी अविनाशी शोभा ती ऱ्हावाले पाहिजे. 5याप्रमाणे पुर्वी, देववर आशा ठेवणाऱ्या भक्तीमान बायासनी बी आपापल्या नवरासना अधीन राहिसन स्वतःले सुंदर दखाडं 6जशी सारा आपला नवरा अब्राहामले धनी म्हणीन त्याना आज्ञामा राहिनी; तस तुम्हीन चांगलं करशात अनं कोणती बी भयप्रद गोष्टले नही घाबरशात, तर तुम्हीन सारान्या पोरी बनशात 7#इफिस ५:२५; कलस्सै ३:१९तसच, माणससवनं तुम्हीन आपला बायकाससंगे, योग्य समजदारपणातीन वागा कारण त्या तुमनापेक्षा जास्त नाजुक शेतस. त्यासले मान दया म्हणजे त्यासले बी तुमनासंगे देवनं जिवनरूपी कृपादान मिळी अनं तुमना प्रार्थनासले आडफाटा येवाऊ नही.
चांगलं करतांना भेटणारा त्रास
8सारांश, तुम्हीन सर्व एकचित्त, अनं समान भावना; एकमेकसवर प्रेम करनारा, दयाळु, नम्र मनना असा व्हा. 9वाईटबद्दल वाईट, शापनाबद्दल शाप देवु नका; तर उलट आशिर्वाद द्या; आशिर्वाद हाई वतन मिळावाकरता तुमले पाचारण करामा येल शे. 10कारण शास्त्र म्हणस;
“जर तुमले जिवनमा आनंद कराना शे
अनं चांगली येळ दखानी ईच्छा शे,
तर तुम्हीन वाईट बोलानापाईन
अनं खोट बोलानापाईन आपली जिभ सांभाळा.
11त्यानी वाईटना त्याग करीसन चांगलं ते करानं;
त्यानी पुर्ण मनतीन शांती प्राप्त कराना प्रयत्न कराना.
12कारण परमेश्वरना डोया धार्मीकसवर राहतस,
अनं त्याना कान त्याना प्रार्थनाकडे राहतस;
तरी वाईट करनारासकडे देव पाठ करी लेस.”
13जर तुम्हीन चांगला गोष्टीस कराकरता तयार शेतस तर तुमनं वाईट करनारा कोण? 14#मत्तय ५:१०अनी जर तुमले धार्मीकपणाबद्दल दुःख सहन करना पडनात, तरी तुम्हीन धन्य; त्यासना भयतीन भिऊ नका अनं घाबरू नका; 15तर ख्रिस्त प्रभु यानं भय धरीसन मनमा आदर ठेवा; अनी तुमनामा जी आशा शे तिनी ईचारपुस करनारा प्रत्येक माणुसले उत्तर देवाले कायम तयार रहा; तरी ते नम्रतातीन अनं नही घाबरता द्या. 16ते सदभावतीन द्या; यानाकरता की ज्याबद्दल निंदा व्हस, त्याबद्दल ख्रिस्तमाधली तुमनी चांगली वर्तणुकवर आळ लेणारासनी लज्जित व्हवाले पाहिजे. 17चांगलं करीसन बी दुःख सहन करानं हाई जर देवनी ईच्छा व्हई तर, वाईट करीसन दुःख सहन करापेक्षा ते बर शे. 18कारण आपलाले परमेश्वरजोडे लई जावाकरता ख्रिस्तनी बी पापसकरता, म्हणजे नितीमान माणुसनी अनितीमान लोकसकरता एकदाव मरना; तो शरिरना रूपतीन माराई गया अनी अध्यात्मिकपणतीन जिवत कराई गया; 19त्या आत्माना रूपतीन त्यानी जाईन बंदिशाळामाधला आत्माजोडे घोषणा करी. 20ह्याच त्या आत्मा व्हतात ज्यासनी नोहाना दिनसमा देवना अपमान करा, ते तारू तयार व्हई राहींत तवय देवनी सहनशीलता वाट दखी राहिंती; तारूमा थोडाच म्हणजे आठ प्राणी पाणीमाईन वाचाडामा वनतात. 21ते चिन्ह बाप्तिस्माना मायक शे, त्यानाघाई शरिरना मळ दुर कराना नही, तर चांगलं मन ठेवाकरता देवसंगे करार करनं हाई व्हतं; ते तो आते येशु ख्रिस्तना पुनरूत्थानघाई तुमले वाचाडी राहिना. 22येशु स्वर्गमा जाईसन देवना उजवीकडे बसेल शे; अनी स्वर्गदूत अनी स्वर्गीय अधिकारी अनी सत्ताधीश#3:22 सत्ताधीश आकाशमातील दुष्ट आत्मा#इफिस ६:१२; दानीएल १०:१२,१३ या त्याना अधीन शेतस.

Currently Selected:

१ पेत्र 3: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in