YouVersion Logo
Search Icon

जख. 5

5
उडता पट
1नंतर मी वळलो व डोळे वर करून पाहीले, आणि मला उडतांना एक पट दिसला. 2त्या देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी उत्तर दिले, “मला उडता पट दिसत आहे, त्याची लांबी वीस हात व रूंदी दहा हात आहे.”
3तेव्हा देवदूताने मला सांगितले, “त्या पटावर एक शाप लिहिला आहे आणि त्यावरील लेखानुसार प्रत्येक चोर यावरील एका बाजूस लिहीलेल्या शापानुसार देशातून घालवला जाईल आणि दुसऱ्या बाजूवरील लेखानूसार खोटी शपथ वाहणाऱ्या प्रत्येकाला देशातून घालवले जाईल.
4सेनाधीश परमेश्वर म्हणतो: मी हा पट चोरांच्या आणि माझ्या नावाने खोटी वचने देणाऱ्या लोकांच्या घरी पाठवीन.
तो तेथेच राहील आणि त्या घरांचा नाश करील. दगड व लाकडी खांबांचासुध्दा नाश होईल.”
एफातली स्त्री
5मग माझ्याशी बोलणारा देवदूत बाहेर गेला आणि मला म्हणाला, “तुझे डोळे वर करून बघ! काय येत आहे?” 6मी विचारले, “ते काय आहे?” तो म्हणाला, “ती एक मापन-टोपली आहे. हे त्यांच्या संपूर्ण देशाच्या पापाचे #डोळ्यांचेरूपक आहे.” 7मापन-टोपलीवरचे झाकण वर उचलेले होते आणि त्या मापन-टोपलीत एक स्त्री बसली होती.
8देवदूत म्हणाला, “ही स्त्री दुष्टता आहे!” मग त्याने त्या तिला मापन-टोपलीच्या मध्यभागी टाकले आणि त्याने शिशाचे वजन मापन-टोपलीच्या मुखावर टाकले. 9नंतर मी माझे डोळे वर केले व पाहिले, तर मला करकोच्यासारखे पंख असलेल्या दोन स्त्रिया दिसल्या. त्या उडाल्या, त्यांच्या पंखात वारा भरला होता. त्यांनी ती टोपली उचलून आकाश व पृथ्वी यांच्या मधून नेली.
10मग माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “त्या ती टोपली कोठे घेऊन जात आहेत?” 11देवदूत मला म्हणाला, “शिनार देशामध्ये त्या मापन-टोपलीसाठी एक मंदिर बांधण्यासाठी त्या जात आहेत. जेव्हा ते घर पूर्ण होईल तेव्हा ती टोपली तेथे ठेवतील.”

Currently Selected:

जख. 5: IRVMar

Highlight

Copy

Compare

Share

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in