YouVersion Logo
Search Icon

नीति. 23

23
1जेव्हा तू अधिपतीबरोबर जेवायला बसतोस,
तेव्हा काळजीपूर्वक तुझ्यापुढे कोण #कायआहे याचे निरीक्षण कर,
2आणि जर तू खादाड असलास तर
आपल्या गळ्याला सुरी लाव.
3त्याच्या मिष्टान्नांची हाव धरू नको,
कारण ती लबाडाची खाद्ये आहेत.
4श्रीमंत होण्यासाठी खूप कष्ट करू नको;
तुम्ही आपल्या ज्ञानाने कोठे थांबावे समजून घे.
5जेव्हा तू जो जाणारा पैसा आहे त्यावर आपली नजर लावशील,
आणि अचानक ते पंख धारण करतील,
आणि ते गरुडासारखे आकाशाकडे उडून जातील.
6जो कोणी तुझ्या अन्नाकडे खूप वेळ पाहतो त्या दुष्ट मनुष्याचे अन्न खाऊ नको,
आणि त्याच्या मिष्टान्नाची इच्छा धरू नको,
7तो अशाप्रकारचा मनुष्य आहे जो अन्नाची किंमत मोजतो.
तो तुला खा व पी! म्हणतो,
परंतु त्याचे मन तुझ्यावर नाही.
8जे थोडेसे अन्न तू खाल्ले ते ओकून टाकशील,
आणि तुमच्या शुभेच्छा व्यर्थ जातील.
9मूर्खाच्या कानात काही सांगू नको,
कारण तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांचा तिरस्कार करील.
10जुन्या सीमेचा दगड काढू नको;
किंवा अनाथाची शेती बळकावू नको.
11कारण त्यांचा तारणारा समर्थ आहे;
आणि तो त्यांचा कैवार घेऊन तुमच्याविरुध्द होईल.
12तू आपले मन शिक्षणाकडे
आणि आपले कान ज्ञानाच्या वचनाकडे लाव.
13मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नको;
कारण जर तू त्यास छडीने मारले तर तो मरणार नाही.
14जर तुम्ही त्यास छडीने मारले,
तर तुम्ही त्याचा जीव अधोलाकापासून वाचवाल.
15माझ्या मुला, तू जर शहाणा असलास
तर मग, माझ्या मनालाही आनंद होईल.
16तुझे ओठ योग्य ते बोलत असता,
माझे अंतर्याम आनंदित होईल.
17तुझ्या हृदयाने पातक्यांचा हेवा करू नये,
पण सारा दिवस तू सतत परमेश्वराचे भय धरीत जा.
18कारण त्यामध्ये खचित भविष्य आहे;
आणि तुझी आशा तोडण्यात येणार नाही.
19माझ्या मुला माझे ऐक, आणि सुज्ञ हो आणि आपले मन सरळ मार्गात राख.
20मद्यप्यांबरोबर
किंवा खादाडपणाने मांस खाणाऱ्याबरोबर मैत्री करू नकोस.
21कारण मद्य पिणारे आणि खादाड गरीब होतात,
झोपेत वेळ घालवणारा चिंध्यांचे वस्त्र घालील.
22तू आपल्या जन्मदात्या पित्याचे ऐक,
तुझी आई म्हातारी झाली म्हणून तिचा तिरस्कार करू नको.
23सत्य विकत घे, पण ते विकू नको;
शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा ही विकत घे.
24नीतिमानाचा पिता फार उल्लासेल,
आणि सुज्ञ मुलास जन्म देणारा त्याच्याविषयी आनंदित होईल.
25तुमच्या आई आणि वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या.
जिने तुला जन्म दिला तिला आनंद घेऊ दे.
26माझ्या मुला, तू आपले हृदय मला दे,
आणि तुझे डोळे माझ्या मार्गाचे निरीक्षण करोत.
27कारण वेश्या ही खोल खड्डा आहे
आणि दुसऱ्या मनुष्याची पत्नी ही अरुंद खड्डा आहे.
28ती चोरासारखी वाट बघत असते,
आणि ती मनुष्यजातीत विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.
29कोणाला हाय? कोणाला दुःख? कोणाला लढाई?
कोणाला गाऱ्हाणी? कोणाला विनाकारण जखमा?
कोणाला आरक्त डोळे आहे?
30जे मद्य पीत रेंगाळतात,
जे मिश्र मद्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतात.
31जेव्हा मद्य लाल आहे,
जेव्हा तो प्याल्यात चमकतो,
आणि खाली कसा सहज उतरतो तू त्याकडे पाहू नको.
32पण शेवटी तो सापासारखा चावतो,
आणि फुरशाप्रमाणे झोंबतो.
33तुझे डोळे विलक्षण गोष्टी पाहतील;
आणि तुझे मन विकृत गोष्टी उच्चारील.
34जो समुद्रामध्ये आडवा पडला त्याच्यासारखा,
अथवा डोलकाठीच्या माथ्यावर जो झोपला त्याच्यासारखा तू होशील.
35तुम्ही म्हणाल, “त्यांनी मला तडाखा दिला! पण मला काही लागले नाही.
त्यांनी मला पिटले पण मला ते जाणवले नाही.
मी केव्हा जागा होईल? मी पुन्हा त्याचे सेवन करीन.”

Currently Selected:

नीति. 23: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in