YouVersion Logo
Search Icon

यहो. 23

23
इस्त्राएल लोकांपुढे यहोशवाचे भाषण
1परमेश्वराने इस्राएलला त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून विसावा दिल्यानंतर बराच काळ लोटला, आणि यहोशवा वृद्ध झाला होता. 2तेव्हा यहोशवाने सर्व इस्राएल, त्यांचे वडील व त्यांचे मुख्य पुरुष व त्यांचे न्यायाधीश व त्यावरील कारभारी यांना बोलावून सांगितले, “मी फार वृद्ध झालो आहे. 3तुमच्यासाठी, या सर्व राष्ट्रांसोबत तुमचा देव परमेश्वर याने सर्वकाही कसे केले, हे सर्व तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. कारण परमेश्वर देव, जो स्वतः केवळ तुमच्यासाठी लढला. 4पाहा, या उरलेल्या राष्ट्रांचा आणि जी राष्ट्रे मी मारून टाकली त्यांचा सर्व देश यार्देनेपासून पश्चिमेकडल्या मोठ्या समुद्रापर्यंतही मी तुम्हाला तुमच्या वंशाप्रमाणे वतनासाठी वाटून दिला आहे. 5आणि तुमचा देव परमेश्वर स्वत: त्यांना तुमच्यापुढून घालवील, आणि त्यांना तुमच्यापुढून वतनातून काढीलच, आणि जसे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला सांगितले, तसे तुम्ही त्यांचा देश वतन करून घ्याल. 6तेव्हा चांगले बळकट व्हा, यास्तव मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात जे लिहिलेले आहे त्या सर्वांचे पालन करा आणि त्यांपासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका. 7तुमच्याजवळ जी राष्ट्रे उरलेली आहेत त्यांमध्ये तुम्ही जाऊ नका, आणि त्यांच्या देवांच्या नावांची आठवण करू नका, आणि त्यांची शपथ घालू नका; त्यांची सेवाही करू नका, आणि त्यांच्या पाया पडू नका. 8परंतु आजपर्यंत जसे तुम्ही करीत आला, तसे आपला देव परमेश्वर याला बिलगून राहा. 9कारण, परमेश्वराने तुमच्यापुढून मोठी व पराक्रमी राष्ट्रे वतनातून घालवली, परंतु तुमची अशी गोष्ट आहे की तुमच्यापुढे आजपर्यंत कोणीही मनुष्य उभा राहू शकला नाही. 10तुमच्यातला एक मनुष्य हजारांची पाठ पुरवील, कारण की तुमचा देव परमेश्वर याने जसे तुम्हाला सांगितले, तसा तो स्वत: तुमच्यासाठी लढतो. 11तर तुम्ही आपला देव परमेश्वर यावर प्रीती करण्यासाठी आपल्या चित्ताची फार खबरदारी घ्या. 12पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे मागे वळाल, आणि जी तुमच्याजवळ उरलेली राष्ट्रे यांच्याशी चिकटून रहाल आणि त्यांच्याशी विवाह करून त्यांच्यामध्ये जाल, आणि ते तुमच्यामध्ये येतील; 13तर तुम्ही हे पक्के समजा की यापुढे तुमचा देव परमेश्वर या राष्ट्रांना तुमच्या नजरेपुढून आणखी घालवणार नाही; आणि जी ही उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिली, तिच्यावरून तुम्ही नाश पावून जाल तोपर्यंत ती तुम्हाला सापळा व पाश व तुमच्या पाठीला चाबूक व तुमच्या डोळ्यांत काटे असे होतील. 14तर पाहा, आज मी सर्व जग जाते त्या वाटेने जात आहे; परंतु तुम्ही आपल्या संपूर्ण मनात व आपल्या संपूर्ण चित्तात जाणता की ज्या चांगल्या गोष्टी तुमचा देव परमेश्वराने तुमच्याविषयी सांगितल्या, त्या सर्वांतली एकही गोष्ट कमी पडली नाही; अवघ्या तुम्हाला प्राप्त झाल्या; त्यातली एकही गोष्ट कमी पडली नाही. 15तर असे होईल की तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला सांगितलेली जी प्रत्येक चांगली गोष्ट, ती जशी तुम्हाला प्राप्त झाली तशी देव तुम्हाला प्रत्येक वाईट गोष्ट प्राप्त व्हावी अशी करील; जी ही उत्तम भूमी तुमच्या देवाने तुम्हाला दिली आहे, तिच्यावरून तो तुमचा नाश करून तुम्हास घालवी तोपर्यंत तो असे करील. 16तुमचा देव परमेश्वर याने जो करार पाळण्याची तुम्हाला आज्ञा केली आहे, तो मोडून दुसऱ्या देवाची सेवा कराल, आणि त्यांना नमन कराल, तर देवाचा राग तुम्हावर भडकेल, आणि जो उत्तम देश त्याने तुम्हाला दिला आहे, त्यातून तुम्हाला त्वरीत नष्ट करील.”

Currently Selected:

यहो. 23: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for यहो. 23