मत्तय 16:24-27
मत्तय 16:24-27 MARVBSI
मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल त्या वेळी ‘तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल.’