एस्तेर 1
1
अहश्वेरोश राजाची आज्ञा वश्ती राणी धुडकावते
1अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले; त्याचे साम्राज्य हिंदुस्तानापासून कूशापर्यंत होते; ज्याचा अंमल एकशे सत्तावीस प्रांतांवर होता तोच हा अहश्वेरोश.
2अहश्वेरोश राजाने शूशन राजवाड्यातल्या आपल्या सिंहासनावर बसल्यानंतर 3आपल्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी आपले सर्व सरदार व सेवक ह्यांना मेजवानी दिली; पारस व मेदय ह्यांचे सेनापती, प्रांतोप्रांतीचे महाजन व सरदार त्याच्यापुढे हजर झाले;
4त्यांना त्याने बहुत दिवसपर्यंत म्हणजे एकशे ऐंशी दिवसपर्यंत आपल्या वैभवशाली राज्याची धनसंपत्ती आणि आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखवले.
5एवढे दिवस गेल्यावर राजाने शूशन राजवाड्यात आलेल्या लहानथोर लोकांना राजमंदिराच्या बागेच्या पटांगणात सात दिवस मेजवानी दिली.
6तेथील पडदे पांढर्या, हिरव्या, व निळ्या रंगाचे होते; हे पडदे तलम सणाच्या व जांभळ्या रंगाच्या दोर्यांनी चांदीच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी खांबांना लावले होते; तेथील मंचक सोन्यारुप्याचे असून तांबड्या, पांढर्या, पिवळ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर ठेवले होते.
7त्या मेजवानीत राजाला पिण्यास योग्य असा द्राक्षारस तर्हेतर्हेच्या सुवर्णपात्रांत घालून राजाच्या औदार्यानुसार लोकांना विपुल पिण्यास देण्यात आला.
8हे पिणे नियमानुसार असे; कोणी कोणाला आग्रह करीत नसे; राजाने आपल्या मंदिराच्या सर्व कारभार्यांना आज्ञा केली होती की त्यांनी पाहुण्यांची तब्येत सांभाळावी.
9वश्ती राणीनेही राजा अहश्वेरोश ह्याच्या राजमंदिरात स्त्रियांना मेजवानी दिली.
10सातव्या दिवशी द्राक्षारसाने राजाचे मन उल्लासयुक्त झाले असता त्याने महूमान, बिगथा, हरबोना, बिग्था, अवगथा, जेरथ, कर्खस असे जे सात खोजे त्याच्या तैनातीस असत त्यांना आज्ञा केली की,
11वश्ती राणीचे सौंदर्य देशोदेशीच्या लोकांना व सरदारांना दाखवावे म्हणून तिला राजमुकुट घालून आपल्यापुढे घेऊन यावे; कारण ती फार देखणी होती.
12खोजांच्या द्वारे राजाची आज्ञा आली तरी वश्ती राणीने येण्याचे नाकारले; त्यावरून राजाला फार क्रोध येऊन तो संतप्त झाला.
13मग राजाने काळ जाणणार्या पंडितांना विचारले; (तो राजा सर्व न्यायशास्त्री व कायदेतज्ज्ञ ह्यांचा असा सल्ला घेत असे;
14त्याच्याजवळ कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना व ममुखान हे पारस व मेदय येथले सात सरदार असत. ते राजाच्या हुजुरास असून राज्यात त्यांचा पहिला मान असे;)
15राजाने त्यांना विचारले की, “अहश्वेरोशाने खोजांच्या द्वारे केलेली आज्ञा वश्ती राणीने मानली नाही तर आम्ही कायदेशीर रीतीने तिचे काय करावे?”
16तेव्हा ममुखानाने राजाला व सरदारांना उत्तर केले, “वश्ती राणीने हा अपमान केवळ राजाचा केला आहे असे नाही, तर सर्व सरदारांचा व अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांत राहणार्या एकंदर लोकांचाही केला आहे.
17राणीच्या ह्या कृत्याची खबर सर्व स्त्रियांना लागेल आणि राजा अहश्वेरोश ह्याने वश्ती राणीला आपल्यासमोर येण्याची आज्ञा केली असूनही ती आली नाही, असे त्यांना कळेल तेव्हा त्या आपापल्या पतींना तुच्छ मानू लागतील.
18आज राणीचे हे कृत्य पारस व मेदय ह्यांच्या ज्या सरदारांच्या स्त्रियांनी ऐकले आहे त्या राजाच्या सरदारांना असेच म्हणू लागतील; तशाने फार अपमान व संताप उत्पन्न होईल.
19राजाची मर्जी असल्याने त्याने एक राजकीय फर्मान फिरवावे आणि काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी व मेदय ह्यांच्या कायद्यांत असे लिहून ठेवावे की वश्तीने राजा अहश्वेरोश ह्याच्यासमोर पुन्हा येऊ नये आणि तिच्याहून कोणी चांगली असेल तिला पट्टराणीचे पद मिळावे.
20राजाची ही आज्ञा त्याच्या सर्व विस्तीर्ण साम्राज्यात जाहीर होईल तेव्हा सर्व बायका आपल्या कनिष्ठ अथवा थोर अशा आपल्या नवर्यांना मान देतील.”
21हे म्हणणे राजाला व सरदारांना पटले आणि ममुखानाच्या सांगण्याप्रमाणे राजाने केले;
22त्याने आपल्या राज्यातील सर्व प्रांतांतून त्या त्या प्रांताच्या लिप्यांत व त्या-त्या राष्ट्राच्या भाषेत पत्रे पाठवली की प्रत्येक मनुष्याने आपल्या घरात सत्ता चालवावी आणि ही आज्ञा आपल्या लोकांच्या भाषेत प्रसिद्ध करावी.
Currently Selected:
एस्तेर 1: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: