YouVersion Logo
Search Icon

1 थेस्सल 1

1
नमस्कार व उपकारस्तुती
1देवपित्याच्या ठायी व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेली थेस्सलनीकाकरांची मंडळी हिला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून : देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.
2आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करतो.
3आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर ह्यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो.
4देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हांला ठाऊक आहेच;
5कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हांला कळवण्यात आली; तसेच तुमच्याकरता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हांला ठाऊक आहे.
6तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात;
7अशाने मासेदोनिया व अखया ह्यांतील सर्व विश्वास ठेवणारे ह्यांना तुम्ही आदर्श झालात.
8मासेदोनिया व अखया ह्यांत तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे, इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे; ह्यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगायचे अगत्य नाही.
9कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे, आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास,
10आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास, तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात, हे ते आपण होऊन आमच्याविषयी सांगतात; त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यांतून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणार आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy