१ शमुवेल 20
20
दावीद आणि योनाथान ह्यांची मैत्री
1मग दावीद रामातील नायोथ येथून पळून गेला आणि योनाथानाकडे जाऊन म्हणू लागला, “मी काय केले? माझ्याकडून काय अपराध घडला? तुझ्या बापाचा मी असा काय गुन्हा केला आहे की तो माझा जीव घ्यायला पाहत आहे?” 2तो त्याला म्हणाला, “असे कधी न घडो; तू मारला जाणार नाहीस; माझा बाप लहानमोठे कोणतेही काम मला सांगितल्यावाचून करीत नाही; तर एवढीच गोष्ट माझ्यापासून तो का गुप्त ठेवील? असे मुळीच होणे नाही.”
3दावीद प्रतिज्ञापूर्वक म्हणाला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे हे तुझ्या बापाला पक्के ठाऊक आहे म्हणून तो म्हणतो की ही गोष्ट योनाथानाला कळू नये; कारण त्याला फार वाईट वाटेल; बाकी परमेश्वराच्या जीविताची व तुझ्या जीविताची शपथ, माझ्यामध्ये व मृत्यूमध्ये केवळ एका पायरीचे अंतर आहे.”
4योनाथान दाविदाला म्हणाला, “तुझ्या जिवास वाटेल ते मी तुझ्यासाठी करीन.”
5दावीद योनाथानाला म्हणाला, “हे पाहा, उद्या चंद्रदर्शन आहे व राजाच्या पंक्तीला बसून भोजन करणे मला चुकणार नाही; तर तू मला जाऊ दे, म्हणजे मी परवा संध्याकाळपर्यंत रानात लपून राहीन.
6तुझ्या बापाने माझे नाव काढलेच तर त्याला सांग की ’दाविदाला आपला गाव बेथलेहेम येथे तातडीने जायचे होते म्हणून त्याने मोठ्या आग्रहाने माझ्याजवळ रजा मागितली; तेथे त्याच्या सगळ्या कुळाचा वार्षिक यज्ञ आहे.’
7‘ठीक आहे,’ असे जर तो म्हणाला तर तुझा दास सलामत आहे असे समज, पण त्याला राग आला तर काहीतरी घात करण्याचा त्याचा हेतू आहे असे समज.
8तर तू आपल्या दासावर कृपा कर; कारण तू परमेश्वराची शपथ वाहून आपल्या दासाशी करार केला आहे; माझ्याकडून काही अपराध घडला असला तर तूच मला मारून टाक; तुझ्या बापाकडे मला कशाला नेतोस?”
9योनाथान म्हणाला, “असे कधी होणार नाही; माझ्या बापाने तुझा घात योजला तर त्याची चाहूल मला लागताच मी तुला सांगणार नाही काय?”
10दावीद योनाथानास म्हणाला, “तुझ्या बापाने तुला कडक जबाब दिला तर ते मला कोण सांगणार?”
11योनाथान दाविदाला म्हणाला, “चल, आपण मैदानात जाऊ.” मग ते दोघे मैदानात गेले.
12योनाथान दाविदाला म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर साक्षी, मी उद्या अथवा परवा ह्या सुमाराला माझ्या बापाचे मनोगत काढल्यावर तुझ्या हिताचे काही असले तर ताबडतोब तुला सांगून पाठवणार नाही काय?
13तुझा घात करण्याचे माझ्या बापाच्या मनात असले तर मी तुला ते कळवून तू सुखरूप जावे म्हणून तुला मी रवाना केले नाही तर योनाथानाचे असेच, किंबहुना ह्याहूनही अधिक अनिष्ट परमेश्वर करो; परमेश्वर जसा माझ्या बापाच्या बरोबर आहे तसाच तो तुझ्याबरोबर असो.
14माझा अंत न व्हावा म्हणून मी जिवंत आहे तोवर परमेश्वराची प्रेमदया तू माझ्यावर करावीस.
15एवढेच नव्हे तर माझ्या घराण्यावरून आपली कृपादृष्टी कदापि काढून घेऊ नकोस; परमेश्वर दाविदाच्या प्रत्येक शत्रूचा ह्या भूतलावरून उच्छेद करील तेव्हाही ती काढून घेऊ नकोस.
16ह्यामुळे योनाथानाने दाविदाच्या घराण्याशी आणभाक केली; तो म्हणाला, “असे न केल्यास परमेश्वर दाविदाच्या शत्रूंच्या हातून माझे पारिपत्य करो.”
17योनाथानाची दाविदावर प्रीती होती म्हणून त्याने त्याला पुन्हा आणभाक करायला लावले; कारण तो त्याला प्राणासमान प्रिय होता.
18योनाथान त्याला म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे तर तुझी जागा रिकामी पाहून तू नाहीस असे समजून येईल.
19तीन दिवस झाल्यावर ताबडतोब ये आणि तो प्रसंग घडला त्या दिवशी तू ज्या जागी लपून राहिला होतास त्या जागी एजेल नावाच्या शिळेजवळ राहा.
20मग मी जणू काय निशाणा मारत आहे असे दाखवून त्या दिशेकडे तीन बाण सोडीन.
21मग पाहा, मी पोरास सांगेन, ‘जा, बाण शोधून आण; पाहा, बाण तुझ्या अलीकडे आहेत ते घेऊन ये’ असे मी त्या पोराला मोठ्याने म्हणालो म्हणजे तू ये; परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझे कुशलच होईल, तुझे वाईट काही होणार नाही.
22पण जर मी त्या पोराला म्हणालो की, ‘बाण तुझ्या पलीकडे आहेत,’ तर तू निघून जा. कारण परमेश्वराने तुला रवाना केले आहे.
23ज्याविषयी तुझे माझे भाषण झाले आहे त्यासंबंधाने तुझ्यामाझ्यामध्ये परमेश्वर निरंतर साक्षी असो.”
24मग दावीद जाऊन मैदानात लपला; चंद्रदर्शनाच्या दिवशी राजा भोजनाला बसला.
25राजा नेहमीप्रमाणे भिंतीजवळील आपल्या आसनावर बसला; मग योनाथान आपल्या जागेवरून उठला आणि अबनेर शौलाच्या बाजूला बसला; पण दाविदाची जागा रिकामी होती.
26शौल त्या दिवशी काहीएक बोलला नाही; त्याला वाटले की त्याला काहीतरी झाल्यामुळे तो अशुचि झाला असेल; खात्रीने तो शुद्ध नसावा.
27चंद्रदर्शनाच्या दुसर्या दिवशीही दाविदाची जागा रिकामीच होती; तेव्हा शौल आपला पुत्र योनाथान ह्याला म्हणाला, “इशायपुत्र काल व आज भोजनास का आला नाही?”
28योनाथान शौलाला म्हणाला, “दाविदाने बेथलेहेमाला जाण्यासाठी मोठ्या आग्रहाने माझ्याकडे रजा मागितली.
29तो म्हणाला, मला जाऊ दे, कारण त्या नगरात आमचे कूळ यज्ञ करणार आहे, आणि माझ्या भावाने मला तेथे बोलावले आहे, तर आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर मला जाऊ दे, म्हणजे मी आपल्या भावांना भेटून येईन; ह्यामुळेच तो राजाच्या पंक्तीला आला नाही.”
30तेव्हा शौलाचा कोप योनाथानावर भडकला आणि तो त्याला म्हणाला, “अरे दुष्ट, फितुरखोर बायकोच्या पोरा, तुझी व तुझ्या आईची बेअब्रू व्हावी म्हणून तुझे मन इशायपुत्रावर बसले आहे हे मला ठाऊक नाही काय?
31जोवर हा इशायपुत्र ह्या भूतलावर जिवंत आहे तोवर तुला व तुझ्या राज्याला कधीही स्थिरता प्राप्त व्हायची नाही; तर आता बोलावणे पाठवून त्याला माझ्याकडे आण; त्याला अवश्य मारून टाकायचे आहे.”
32योनाथान आपला बाप शौल ह्याला म्हणाला, “त्याला मारून का टाकायचे? त्याने काय केले आहे?”
33तेव्हा शौलाने योनाथानाला मारण्यासाठी भाला उगारला; त्यावरून तो समजला की दाविदाला जिवे मारण्याचा आपल्या बापाचा निश्चय झाला आहे.
34तेव्हा योनाथान क्रोधाने संतप्त होऊन मेजावरून उठला आणि त्या द्वितीयेस त्याने अन्न खाल्ले नाही; आपल्या बापाने दाविदाची अप्रतिष्ठा केली म्हणून त्याच्याबद्दल त्याला फार खेद झाला.
35सकाळीच योनाथान आपल्याबरोबर एक लहान पोरगा घेऊन मैदानात दाविदाने नेमलेल्या ठिकाणी गेला.
36तो आपल्या पोराला म्हणाला, “मी बाण सोडतो ते शोधून आण. तो पोरगा धावू लागला तेव्हा त्याने त्याच्या पलीकडे जाईल असा एक बाण सोडला.
37योनाथानाने सोडलेल्या बाणाच्या टप्प्याजवळ तो पोरगा जाऊन पोहचला तेव्हा योनाथान त्याला ओरडून म्हणाला, “बाण तुझ्या पलीकडे आहे ना!”
38योनाथान त्या पोराला म्हणाला, “त्वरा कर, धाव, विलंब लावू नकोस.” तेव्हा तो योनाथानाचा पोरगा बाण गोळा करून आपल्या धन्याकडे आला.
39त्या पोराला त्यातले काही कळले नाही; योनाथान व दावीद ह्यांनाच ती गोष्ट माहीत होती.
40योनाथानाने आपली हत्यारे आपल्या पोराला देऊन सांगितले की, “ही नगरात घेऊन जा.”
41तो पोरगा निघून जाताच दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणाकडून उठून आला व त्याने भूमीवर उपडे पडून तीनदा नमन केले; मग एकमेकांचे चुंबन घेऊन ते रडू लागले; दावीद तर मनस्वी रडला.
42तेव्हा योनाथान दाविदाला म्हणाला, “सुखरूप जा; परमेश्वर तुझ्यामाझ्यामध्ये आणि तुझ्यामाझ्या संततीमध्ये निरंतर साक्षी असो; आपण दोघांनी परमेश्वराच्या नामाने आणभाक केली आहे.” मग तो उठून चालता झाला व योनाथान नगरात गेला.
Currently Selected:
१ शमुवेल 20: MARVBSI
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: