ते खुद्द परमेश्वराच्या स्वरुपाचे असूनही
त्यांनी स्वतःस परमेश्वरासमान केले नाही
व परमेश्वरासम असण्याचा लाभ त्यांनी घेतला नाही;
उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले
आणि दासाचे स्वरूप घेऊन,
मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले.
मानवी रूप धारण करून
त्यांनी स्वतःस लीन केले,
येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास,
आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले.