आते जर काही फांद्या तोडी टाकामा वन्यात अनी तु रानटी जैतुन असता, त्यासना जागी कलम करीसन लावामा वनास, अनं जैतुनना पौष्टीक मुळना भागीदार व्हयनास. तर त्या फांद्यासपेक्षा मी मोठा शे अस बढाई मारू नको. मारशी तर हाई ध्यानमा ठेव की, तु मुळले आधार देयल नही, तर मुळनी तुले आधार देयल शे.