पण त्यानं धनुष्य मजबूत राहिना; याकोबना समर्थ देव, मेंढपाळ, याकोबना खडक याना नावतीन त्याना भुज स्फुरण पावना. तुना सहाय्य करनारा तुना बापना देव, तुले वरदान देनारा सर्वसमर्थ देव यानाकडीन हाई व्हई, वरतीन आकाशनी अनं खालतीन जलाशयना वरदाने तो तुले दि, आंगवर पिनारासना अनं पोटना फळसना वरदाने तो तुले दि.