मी तुले तुना लोकसपाईन अनी गैरयहूदी लोकसपाईन बी ज्यासनाकडे मी तुले धाडी राहीनु, त्यासनापाईन वाचाडत राहसु. यानाकरता की त्यासनी अंधारमाईन उजेडकडे अनी सैतानना अधिकारमातीन देवकडे वळावं, म्हणीसन तु त्यासना डोया उघड; म्हणजे त्यासना पापसनी क्षमा व्हवाले पाहिजे अनी मनावरील ईश्वासमुये देवना निवडेल लोकसमा त्यासले वारसहक्क मिळाले पाहिजे.”