जो पेरणाराले बी पुरावस, अनी, खावाकरता अन्न पुरावस तो तुमले बी दी अनी ते भरपुर करी, अनी तुमनं उदारतानं फळ वाढाई. म्हणजे तुम्हीन सर्व प्रकारणा उदारपणकरता सर्व गोष्टीसघाई श्रीमंत व्हशात; त्या सर्व लोके तुमना दानकरता देवले धन्यवाद देतीन जे तुमले आमनाकडतीन भेटनं.