पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा.” मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा त्याने त्यास यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले, फिलिप्प त्यास म्हणाला, “तुम्ही जे वाचत आहात ते तुम्हास समजते काय?” तो अधिकारी म्हणाला, “मला हे कसे, समजेल कोणीतरी याचा उलगडा करून मला सांगायला हवे?” आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलावले.