YouVersion Logo
Search Icon

Popular Bible Verses from यहेज्केल 1

मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तेव्हा एक विशाल मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता; त्याभोवती प्रभा फाकली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्याच्यासारखे तेज झळकत होते. त्याच्या मध्यभागी चार जिवंत प्राण्यांच्या आकृतींसारखे काही बाहेर पडले; दिसण्यात ते मनुष्याकृती होते. त्या प्रत्येकाला चार मुखे होती, व प्रत्येकाला चार पंख होते. त्यांचे पाय ताठ उभे होते आणि त्यांच्या पायांचे तळवे वासराच्या पायांच्या तळव्यांसारखे असून उजळ पितळेसारखे झळकत होते. त्यांच्या चोहोबाजूंना पंखांच्या खाली त्यांना माणसांचे हात होते; त्या चौघांना मुखे व पंख होते. त्यांचे पंख एकाचे दुसर्‍याशी लागलेले होते; ते चालताना वळत नसत, तर ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीट समोर जात.

Free Reading Plans and Devotionals related to यहेज्केल 1

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy