ख्रिस्ताचे अनुसरण करणे预览

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

12天中的第11天

संपूर्ण शरीराने त्याचे अनुसरण करा

बायबल परिच्छेद:

”ते वचन तर तुझ्या अगदी जवळ,म्हणजे तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे,म्हणून तुला त्याप्रमाणे वागता येईल. पाहा,जीवन व सुख,आणि मरण व दुःख हे आज मी तुझ्यापुढे ठेवले आहेत;तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर,त्याच्या मार्गांनी चाल आणि त्याच्या आज्ञा,विधी व नियम पाळ,ही आज्ञा आज मी तुला देत आहे;म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल;पण तुझे मन फिरले व तू ऐकले नाहीस आणि बहकून जाऊन अन्य देवांना दंडवत घातलेस व त्यांची सेवा केलीस,“

अनुवाद30:14,17

विषय:

आमच्यापैकी प्रत्येकाला येशूचे अनुसरण करण्यासाठी त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी बाहेर पाऊल टाकण्याची गरज भासेल. त्याचे वचन वाचणे आणि त्याला आपले हृदय व मन यांस आकार देण्याची अनुमती देणे अत्यावश्यक असले तरी,तो आम्हास जे करावयास सांगतो ते करणे समान महत्त्वाचे आहे. तो जेथे नेईल तेथे तुम्ही जाल,तो तुम्हाला जे बोलायला सांगतो ते बोलाल आणि तो तुम्हाला जे करायला सांगेल ते कराल का?

हा मोठा प्रश्न आहे.

देवाप्रत आमचे आज्ञापालन आपल्या शिष्यत्वाच्या गुणवत्तेबद्दल बरेच काही म्हणते. शिष्य तो आहे जो कोणतीही किंमत का द्यावी लागेना देवाची आज्ञा पाळतो. आपल्यासोबत समस्या ही असते की आपण निवडक गोष्टींत देवाची आज्ञा पाळण्याची निवड करतो. आम्हाला काही गोष्टी करणे सापे वाटते तर काही कठीण किंवा अशक्य वाटते. असे अपूर्ण आज्ञापालन म्हणजे देवाच्या दृष्टीत संपूर्ण अवज्ञा होय.

तुम्ही काय करावे म्हणून देव तुमच्यावर प्रभाव टाकीत आहे?

तो तुमच्याशी एखाद्याशी समेट करण्याबद्दल बोलत आहे का?

तो तुम्हाला विषारी नातेसंबंध संपवायला लावत आहे का?

तो तुम्हाला तुमची तारणकथा कामावर असलेल्या कोणाशी तरी सामायिक करण्यास सांगत आहे का?

त्या कॉलेजच्या मित्रासाठी प्रार्थना करावी असे तुम्हाला वाटत आहे का?

देव तुम्हाला जे करण्यास सांगतो ते पूर्ण विश्वासाने करा की जो तुम्हाला पाचारण करीत आहे तो तुमच्यासोबत आहे आणि त्याचे कार्य पूर्ण करेल.

जेव्हा देवाचा आत्मा अंतःकरणाला आणि मनाला स्पर्श करतो,तेव्हा तो आम्हाला बदलून टाकतो आणि कृतीत देवाची आज्ञा पाळण्यास तत्पर करतो. कर्मावाचून विश्वास मृत आहे. म्हणून जेव्हा तुम्ही जाणता की देव तुम्हाला बाहेर पाऊल टाकण्यासाठी आणि त्याचे अनुसरण करण्यासाठी पाचारण करीत आहे,तेव्हा त्याच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करा. तो तुम्हाला कधीही अशा ठिकाणी नेणार नाही जेथे त्याची कृपा तुम्हाला सांभाळणार नाही आणि जेथे त्याचे सान्निध्य तुमच्यावर छाया करणार नाही.

आपण कोणाचे अनुसरण करतो हे सर्व महत्वाचे आहे. आम्ही एका खऱ्या परमेश्वर देवाचे अनुसरण करतो. म्हणून पाळक,पुढारी,उपासना पुढारी,प्रसिद्ध व्यक्ति यांच्याने प्रभावित होऊ नका. त्याऐवजी ख्रिस्ताचे अनुसरण करा!

घोषणा: मी माझ्या संपूर्ण अंतःकरणाने,मनाने आणि शक्तीने येशूचे अनुसरण करीन!

读经计划介绍

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

जर तुम्ही हा विचार करीत असाल की खरोखर दररोज येशूचे अनुसरण कसे करावे तर ही बायबल योजना परिपूर्ण आहे. येशूला होय म्हणणे अर्थातच पहिले पाऊल आहे. पण जे होते, ते म्हणजे वारंवार हो म्हणण्याचा आणि त्याच्याबरोबर पाऊल टाकण्याचा आयुष्यभराचा प्रवास आहे.

More

相关题材的计划