ख्रिस्ताचे अनुसरण करणे预览

संपूर्ण मनाने त्याचे अनुसरण करा
आजकालचे काही मुख्य आजार आपल्या मनाशी जुळलेले आहेत. आज मानसिक आरोग्यावर मोठा आघात होत आहे आणि म्हणून आपले विचार आणि विचारसरणी पुनर्स्थापित करण्यासाठी आपल्या मनाचे वेळोवेळी नवीकरण करण्याची गरज आहे. ख्रिस्ताचे अनुसरण करण्यासाठी एक मन असणे आवश्यक आहे,जे त्याच्याद्वारे बदलण्यासाठी मोकळे असावे. आम्ही माइंड ब्लॉक्सबद्दल ऐकले आहे,जेथे आमच्याजवळ काही विशिष्ट लोक,संस्कृती आणि परिस्थितींची काही निश्चित मते आणि कल्पना आहेत. येशूच्या अनुयायांसाठी माइंड ब्लॉक्स प्रेम आणि ऐक्याचे जीवन जगण्यासाठी खूप विनाशकारी असू शकतात. म्हणून,देवाच्या दृष्टीकोनातून जगण्यासाठी देवाला लोकांविषयी आणि परिस्थितींविषयी आपल्या विचारांचे नवीकरण करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. ख्रिस्ताचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला ख्रिस्ताचे मन असणे आवश्यक आहे जे पवित्र आत्म्याद्वारे उत्तरोत्तर बदलत जात आहे. आपले मन आपल्या अंतःकरणातील आकांक्षा आणि भावनांना अनेक वेळा प्रेरित करते. त्यामुळे जुन्या,अनावश्यक आणि हानिकारक वैचारिक नमुन्यांची जागा घेण्यासाठी मनाचा उद्धार आवश्यक आहे.
येशूचे अनुयायी या नात्याने आपल्याला आणखी एका समस्येला तोंड द्यावे लागते ती म्हणजे आपली मने असा तर्क काढतात जो अर्थपूर्ण आणि सुरक्षित वाटतो पण देवावर मर्यादा घालू शकते. आपली वित्त,संसाधने,कौशल्ये,नेटवर्क,आरोग्य इत्यादींची कमतरता आपले लक्ष केंद्रित करते हा विश्वास करण्याऐवजी की देव ते करील जे केवळ तोच करू शकतोे. आपल्या मनाच्या नवीकरणासाठी आवश्यक आहे की आपण भितीला नव्हे तर विश्वासाला वाट द्यावी!
नवीकरण आणि पुनर्स्थापनेचा अभिकर्ता पवित्र आत्मा आहे. तो आपल्या जीवनात प्रत्येक परिस्थितीत कार्य करतो जे आपल्या विचार जीवनाला आकार देण्यासाठी जीवन आपल्या मार्गात टाकत असते. येशूसारखा विचार करणे सुरू करावे म्हणून त्यावर काम करण्यासाठी तुम्ही त्याला तुमच्या मनात आमंत्रित कराल का?
घोषणा: माझे मन ख्रिस्ताद्वारे नवीकृत आणि पुनर्स्थापित झाले आहे.