देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्ये预览

देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्ये

10天中的第2天

अंधाराविरुद्ध लढा

पवित्र शास्त्रातील गोष्ट – बंदिशाळेमध्ये पौल आणि सीला "प्रेषित 16:16-31"

आपण मानवांसोबत झगडत नाही तर सैतान आणि त्याच्या अंधकारातील दुरात्या समूहासोबत लढतो. सैतानाला गैरसमज पसरावयास आवडते आणि तो लोकांचा एकमेकांना दुखविण्यासाठी वापर करतो, परंतू आपण लक्षात ठेवावे की आपले युध्द हे नेहमी सैतानाविरुद्ध आहे! आपले जग पतित आहे आणि मानव म्हणून आपण एकमेकांविरुद्ध पाप करितो. परंतु आपण एकमेकांविरुद्ध लढू नये हे लक्षात ठेवले पाहिजे, कारण तसे करणे म्हणजे शत्रुच्या सापळयात अडकण्यासारखे होईल. देव सर्वांवर प्रेम करतो, जरी आपण चूका करतो तरी. जेव्हा आपण चूका करतो तेव्हा, आपल्या जीवनावर असलेल्या देवाच्या दयेसाठी आपण कृतज्ञ आहोत, तर मग आपणहि दुस-यांवर दया केली पाहिजे. कधीकधी शत्रू आपले शब्द किंवा कृति फिरवतो, परिणामी आपण एकमेकांवर फार रागावतो. असे असले तरी, देव सर्वांवर प्रेम करतो आणि आपणहि सर्वांवर प्रेम केले पाहिजे.

आजच्या पवित्र शास्त्रातील गोष्टीमध्ये, पौल आणि सीला यांना बंदिशाळेत टाकण्यात आले आहे. पहारेकरी त्यांच्यासोबत क्रूरतेने वागतात, जरी त्यांनी काहीहि चूक केलेली नाही. असे असले तरी, देव त्यांना सुटकेचा मार्ग देतो. ते पहारेक-याचा सूड उगवित नाहीत, त्या उलट ते त्याच्यावर दया करतात, त्याला आणि त्याच्या कुटुंबाला ते प्रभूकडे आणतात! पौल आणि सीला, पहारेक-याने त्यांना वाईटरीतीने वागविले म्हणून, त्याला दोष देऊ शकले असते, परंतू त्यांनी लक्षात ठेवले की त्यांचे युध्द सैतान आणि त्याच्या दुरात्मा समूहासोबत आहे.

आपण देवाची शस्त्रसामग्री धारण करीत असतांना आपण लक्षात ठेवावे की आपल्याला आकाशातील दुरात्या समूहासोबत लढायचे आहे, सोबतीच्या मानवांसोबत नाही !

‘‘मी शत्रुविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आहे, माझ्या सभोवती असलेल्या लोकांसोबत नाही.’’

प्रश्न:

1.या शब्दांचा अर्थ काय? सत्ता, अधिकार, या अंधकारमय जगाचे अधिपती आणि आकाशातला दुरात्मा समूह. इफिस 6:12 .

2.आपण अंधकारमय जगासोबत झगडण्याऐवजी मनुष्यांसोबत झगडलो याची कोणती उदाहरणे आहेत?

3.आपल्याला देवाच्या शस्त्रसामग्रीबाबत माहिती असावी असे देवाला का वाटले?

4.तुरूंगात टाकण्यापूर्वी, पौल आणि सीला यांचेबाबत कोणती दुःखदायी गोष्ट घडली?

5.‘‘माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे?’’ या बंदिशाळेच्या नायकाच्या प्रश्नाचे उत्तर काय होते ?

读经计划介绍

देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्ये

देवाची शस्त्रसामग्री धारण करणे हे रोज सकाळी केल्या जाणारी एक प्रार्थना विधी नव्हे परंतु तो जीवन जगण्याचा एक असा मार्ग आहे ज्याची सुरुवात आपण तरुण असतानाच करू शकतो. क्रिस्टी क्रॉसने लिहिलेली ही वाचन योजना प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातील वीरांकडे लक्ष देते.

More