देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्ये预览

देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्ये

10天中的第5天

नितीमत्वाचे उरस्त्राण

पवित्र शास्त्रातील गोष्ट – कर्नेल्य "प्रेषित 10:9-23"

इफिस अध्याय 6 मध्ये सांगितलेले देवाच्या शास्त्रातील पुढील शस्त्र नितिमत्वाचे उरस्त्राण आहे.नितिमत्व म्हणजे दैवी चारित्र्य दाखविणे, किंवा जे खरे, चांगले आणि विश्वासू ते करणे. प्रभू समोर जे योग्य ते करत राहण्याची कृती आपले उरस्त्राण जागेवर ठेवते. देव आपल्याला वचनामध्ये सांगतो कि आपण हुशार व्हावे आणि योग्य ती गोष्ट करावी. जेव्हा आपण तसे करतो, तेव्हा आपण खात्री बाळगावी कि आपले उरस्त्राण जागेवर राहिल, आणि जेव्हा आपण लढाईत राहू तेव्हा आपले हृदय सुरक्षित राहतील.उरस्त्राणा बद्दल एक महत्वाची गोष्ट आहे कि ते आपल्या हृदयाला झाकते जो एक महत्वाचा अवयव आहे, परंतू केवळ समोरून.जेव्हा आपण ते घालतो तेव्हा आपण जखमी होवू शकतो परंतू तरी सुध्दा उठून आपण चालतच राहू शकतो.परंतू आपण लढाई समोरून लढावी कारण उरस्त्राण केवळ समोरील बाजू झाकते. जर आपण पलटून माघार घेवून पळालो तर ते आपले संरक्षण करणार नाही.पवित्र चरित्र आणि नितिमत्व काय आहे? आपल्या कडे ते आहे हे आपल्याला कसे कळेल? पवित्र शास्त्र सांगते कि कर्नेल्य समर्पित आणि देवाला भिऊन वागणारा मनुष्य होता जो उदारपणे दान देत होता आणि नियमित प्रार्थना करत असे. पवित्र शास्त्र हे देखील सांगते कि सर्व यहूदी लोक त्याला मान देत होते.जेव्हा तुम्ही नितिमान आहात तेव्हा इतरांना कळेल कारण वेळे बरोबर ते पाहण्यासाठी स्पष्ट होईल.कर्नेल्यने नितिमत्वाचे उरस्त्राण घातलेले होते. त्यावेळेस, हेल्लेण्यांबरोबर संबंध ठेवणे किंवा त्यांची भेट घेणे सुध्दा यहुदी नियमांच्या विरुद्ध होते. ( प्रेषित 10:28 ) देवाने पेत्राला दर्शन दिले कि त्याने जाऊन कर्नेल्य ला शुभवर्तमान सांगावे.

कर्नेल्य देव भिरू माणूस होता म्हणून देवाने त्याचे व त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे तारण व्हावे म्हणून कोणाला तरी पाठविले. ( नियमांच्या विरुद्ध असूनही) !

‘‘मी नेहमी योग्य ते करण्याची निवड करतो.’’

प्रश्न:

1.तुमच्या जीवनाच्या कोणत्या परिस्थितीत तुम्ही हे दाखविले आहे कि तुम्ही नितिमत्वाचे उरस्त्राण घातले आहे आणि केव्हा नाही?

2.नितिमत्वाचा आव कसा आणला जावू शकतो ते सांगा.

3.कोणत्या परिस्थितीत संकोचीत होण्या ऐवजी तुम्ही शांत राहण्याची निवड करता?

4.पेत्र कोणच्या घरी भेटण्यासाठी गेला? हे असामान्य का होते?

5.कर्नेल्य त्याच्या क्षेत्रातील इतर मनुष्यांपेक्षा वेगळा कसा होता?

读经计划介绍

देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्ये

देवाची शस्त्रसामग्री धारण करणे हे रोज सकाळी केल्या जाणारी एक प्रार्थना विधी नव्हे परंतु तो जीवन जगण्याचा एक असा मार्ग आहे ज्याची सुरुवात आपण तरुण असतानाच करू शकतो. क्रिस्टी क्रॉसने लिहिलेली ही वाचन योजना प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातील वीरांकडे लक्ष देते.

More