देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्ये预览

विश्वासाची ढाल
पवित्र शास्त्रातील गोष्ट – पौल आणि नौकाभंग"प्रेषित 27:21-37, 28:1"
आज आपण विश्वासाच्या ढाली बद्दल शिकत आहोत, सुरक्षेसाठी एक चांगले शस्त्र कारण आपण ते हलवू शकतो आणि विशिष्ट हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो.पवित्र शास्त्र सांगते कि आपण त्याचा उपयोग दुष्टाचे जळते बाण विझविण्यासाठी करू शकतो. ते असे म्हणत नाही कि ‘‘जर’’ बाण आले तर परंतू ‘‘जेव्हा’’ बाण येतील, तेव्हा आपण त्याच्या विरुद्ध शक्ति हिन राहणार नाही.सत्य हे आहे कि शत्रू सतत आपल्यावर हल्ला करत असतो. तुमचा शत्रू जळत्या बाणांनी तुमचे लक्ष विचलितआणि तुम्हाला आश्चर्यचकित करू इच्छितो. त्याने हे धोरण विशिष्ट रित्या तुमच्यासाठी तयार केले आहे. त्याने तुमच्या सवयी, तुमच्या सर्व सखोल भिती, आणि तुमची कमजोरी ह्यांचा अभ्यास केला आहे, आणि त्याचे बाण विशेष करून त्या विशिष्ट क्षेत्राकडे नेमले आहेत.
विश्वास देवावर आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवणे आहे, जरी आपण त्याचे आध्यात्मिक राज्य पाहू शकत नसलो तरी. आपण देवाला पाहू शकत नसलो तरी देव आहे हे आपल्याला माहित आहे हे आपल्या मनात विश्वास असणे आहे. आपल्यामध्ये विश्वास असतांना आपण शत्रूचे हे निर्देशित हल्ले पराभूत करू शकतो.
आजच्या प्रेषितांचे कृत्ये पुस्तकातील पवित्र शास्त्रातील गोष्टीत, पौल भयंकर वादळाच्या वेळेस समुद्रात होता, आणि देव त्याला सांगतो कि जहाजावरील कोणीच वादळात मरणार नाही! जरी पौल देवाला पाहू शकत नव्हता तरी त्याने देव जे त्याच्या बरोबर बोलला त्याच्यावर विश्वास ठेवण्याची निवड केली. त्यानंतर देवाने पौलाला जे सांगितले आणि त्यांना शक्तिसाठी भरपूर जेवण करायला लावले हे पाहणे मनोरंजक आहे. पौलाने केवळ देवावर विश्वास ठेवला नाही, तर तो देवाचा संदेश सार्वजनिक रित्या इतरांना सांगण्यसाठी व त्यानुसार करण्यासाठी तयार होता! जर नौकाभंगात कोणी मरण पावले असते तर तो भयंकर रित्या संकोचला असता. कधी कधी आपल्यालाही मनुष्याच्या ऐवजी देवाच्या वचनावर विश्वास ठेवून सार्वजनिक होण्याची गरज आहे.
जे तुम्ही पाहू शकत नाही त्याबद्दल शाश्वत होऊन तुम्ही तुमची विश्वासाची ढाल हाती घ्याल का? ह्या प्रकारे तुम्ही शत्रू विरुद्ध जिंकू शकाल आणि त्याचे जळते बाण विझवू शकाल!
‘‘मी देवावर विश्वास ठेवण्याची निवड करतो.’’
प्रश्न:
1.वास्तविक जीवनात, ‘‘दुष्टाचे जळते बाण कोणते आहेत?’
2.सर्वसाधारण जीवनात तुम्ही तुमच्या विश्वासाच्या ढालीने बाण कसे हुकवू शकता ह्याचे विशिष्ट उदाहरण काय आहे?
3.तुम्ही विश्वासाशिवाय तुमचे घर सोडणार नाही किंवा घराच्या बाहेर निघणार नाही हे निश्चित करण्यासाठी तुम्ही काय करावे?
4.आजच्या पवित्र शास्त्रातील गोष्टी मध्ये पौल जहाजात बसून कुठे जात होता? जहाजावर किती लोक होते?
5.पौलाला कसे कळले कि वादळात जहाजाचे नुकसान होईल आणि इतर कोणीही मरणार नाही?
读经计划介绍

देवाची शस्त्रसामग्री धारण करणे हे रोज सकाळी केल्या जाणारी एक प्रार्थना विधी नव्हे परंतु तो जीवन जगण्याचा एक असा मार्ग आहे ज्याची सुरुवात आपण तरुण असतानाच करू शकतो. क्रिस्टी क्रॉसने लिहिलेली ही वाचन योजना प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातील वीरांकडे लक्ष देते.
More