गणना 17
17
अहरोनाची काठी फुलते
1याहवेह मोशेला म्हणाले, 2“इस्राएली लोकांशी बोल व त्यांच्याकडून त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्याकडून एक काठी अशा बारा काठ्या घे. प्रत्येक पुरुषाचे नाव त्याच्या काठीवर लिही. 3लेवी वंशाच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण प्रत्येक पूर्वजांच्या गोत्राच्या पुढार्याची एक काठी असावी. 4सभामंडपात जिथे मी तुझी भेट घेत असतो, तिथे कराराच्या नियमाच्या कोशापुढे त्या काठ्या ठेवाव्या. 5ज्या पुरुषाची मी निवड करेन त्याच्या काठीला अंकुर फुटेल आणि इस्राएली लोक तुमच्याविरुद्ध सातत्याने जी कुरकुर करतात त्यापासून मी स्वतःची सुटका करेन.”
6म्हणून मोशे इस्राएली लोकांशी बोलला आणि त्यांच्या पुढार्यांनी त्याला बारा काठ्या दिल्या, त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्याकडून एक काठी आणि त्यांच्यामध्ये एक अहरोनाची काठी होती. 7मोशेने त्या काठ्या कराराच्या नियमाच्या मंडपात याहवेहसमोर ठेवल्या.
8दुसर्या दिवशी मोशे मंडपात गेला आणि अहरोनाची काठी जी लेवी वंशाच्या वतीने ठेवली होती, ती केवळ अंकुरितच नव्हे तर त्याला कळी आली असून तिच्यावर बदाम पिकलेले दिसले. 9मग मोशेने त्या सर्व काठ्या याहवेहच्या समक्षतेतून इस्राएली लोकांकडे आणल्या. त्यांनी त्या पाहिल्या आणि प्रत्येक पुढार्याने आपआपली काठी घेतली.
10तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाची काठी कराराच्या नियमाच्या कोशापुढे परत ठेव, बंड करणार्यांना चिन्ह म्हणून ती तिथे ठेवावी. अशाने माझ्याविरुद्ध करीत असलेल्या त्यांच्या कुरकुरीचा शेवट होईल, म्हणजे ते मरणार नाहीत.” 11याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणेच मोशेने केले.
12इस्राएली लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरून जाऊ! आम्ही हरलो आहोत, आम्ही सर्व हरलो आहोत! 13जो कोणी याहवेहच्या निवास मंडपाजवळ जरी येईल तरी त्याचा नाश होईल. आम्ही सर्व मरणार आहोत का?”
Attualmente Selezionati:
गणना 17: MRCV
Evidenzia
Copia
Confronta
Condividi
Vuoi avere le tue evidenziazioni salvate su tutti i tuoi dispositivi?Iscriviti o accedi
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.