1
लूक 9:23
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
MACLBSI
त्याने सर्वांना म्हटले, “जर कोणी माझे अनुसरण करू पाहत असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व दररोज स्वतःचा क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे.
Porovnat
Zkoumat लूक 9:23
2
लूक 9:24
जो कोणी आपला जीव वाचवू पाहत असेल तो आपल्या जिवाला मुकेल. परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.
Zkoumat लूक 9:24
3
लूक 9:62
येशूने त्याला म्हटले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो देवाच्या राज्यासाठी योग्य नाही.”
Zkoumat लूक 9:62
4
लूक 9:25
जर माणसाने सगळे जग कमावले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला, तर त्याला काय लाभ?
Zkoumat लूक 9:25
5
लूक 9:26
ज्याला माझी व माझ्या वचनांची लाज वाटते, त्याची लाज मनुष्याच्या पुत्राला तो स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या वैभवाने येईल तेव्हा वाटेल.
Zkoumat लूक 9:26
6
लूक 9:58
तो त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे व आकाशातल्या पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला जागा नाही.”
Zkoumat लूक 9:58
7
लूक 9:48
आणि त्यांना म्हटले, “जो कोणी ह्या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो ज्याने मला पाठवले, त्याचा स्वीकार करतो. तुम्हां सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे.”
Zkoumat लूक 9:48
Domů
Bible
Plány
Videa