1
लूक 3:21-22
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
MACLBSI
तेथील सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतल्यावर येशू बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता आकाश उघडले गेले, पवित्र आत्मा दृश्य रूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी प्रसन्न आहे.”
Porovnat
Zkoumat लूक 3:21-22
2
लूक 3:16
योहान त्या सर्वांना उत्तर देत असे, “मी तर तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतणांचा बंद सोडायलाही मी पात्र नाही, तो येत आहे. तो तुम्हांला पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा देइल.
Zkoumat लूक 3:16
3
लूक 3:8
तुमचा पश्चात्ताप दिसून येईल अशी सत्कृत्ये करा आणि अब्राहाम आमचा बाप आहे, असे आपल्या मनात म्हणू नका कारण मी तुम्हांला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामसाठी मुले निर्माण करायला देव समर्थ आहे!
Zkoumat लूक 3:8
4
लूक 3:9
आताच तर झाडाच्या मुळावर कुऱ्हाड उचललेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही, ते ते तोडून अग्नीत टाकले जाईल.”
Zkoumat लूक 3:9
5
लूक 3:4-6
अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू आली, प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. प्रत्येक दरी भरली जाईल. प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल. वळणावळणाचे रस्ते सरळ केले जातील. खडबडीत वाटा समतल केल्या जातील आणि सर्व लोक देवाने केलेले तारण पाहतील.
Zkoumat लूक 3:4-6
Domů
Bible
Plány
Videa