मत्तय 19

19
फारकती ना बारामा येशु नि शिक्षा
(मार्क 10:1-12)
1जव येशु या गोष्टी सांगी दियेल होता, त गालील जिल्हा मधून चालना गया आणि यार्देन नदी ना त्या पार यहूदीया प्रांत मा उना. 2तव मोठी गर्दी तेना मांगे येवू लागणी आणि तेनी तठे तेस्ले बरा करना.
3तव परूशी लोक नि तेनी परीक्षा लेवा साठे जोळे ईसन सांगू लागनात, काय प्रत्येक कारण वर आपली बायको ले सोडान योग्य शे. 4येशु नि उत्तर दिध, “काय तुमी वाचेल नई. कि जेनी तेस्ले बनाव, तेनी सुरुवात पासून नर आणि नारी बनाईसन सांगणा.”
5“या कारण वर माणुस आपला माय-बाप पासून आल्लग हुईसन आपली बायको ना संगे राहीन आणि त्या दोनी एक तन होतीन.”
6एनासाठे त्या आते पासून दोन लोकस सारखा नई, पण त्या एक एकदेह हुई जायेल शे. एनासाठे ज्या लोकस्ले परमेश्वर नि एकत्र जोळेल शे, तेले कोणी बी व्यक्ती आल्लग नका करा. 7तेस्नी तेले सांग, “मंग मोशे नि काबर ठहराव कि सूटपत्र दिसन तेले सोडी द्या.” 8येशु नि तेस्ले सांग, “मोशे नि तुमना मन नि कठोर ताना कारण तुमले आपली आपली बायको सोडानी आदन्या दिधी, पण सुरुवात पासून नई होती. 9मी तुमले सांगस, कि जो कोणी व्यभिचार ले सोळीसन, दुसरा कोणताही कारण वर कोणी आपली बायको ले सोळीसन दुसरी संगे लग्न करीन, त तो व्यभिचार करस, आणि जो ती सोडेल बाई संगे लग्न करस तो बी व्याभिचार करस.”
10तेना शिष्यस्नी तेले सांग, जर बाई ना पुरुषना संगे असा संबंध शे त लग्न कराले चांगल नई. 11येशु तेस्ले सांग, “फक्त त्या लोकस्ले जेस्ले परमेश्वर नि एखटा राहाणा वरदान दियेल शे, त्या ह्या शिक्षास्ले स्वीकारू सकतस. 12कारण काही नपुसंक असा शेत, ज्या जन्मा पासून असाच जन्मले एयेल शे, आणि काही नपुसंक असा शेत, जेस्ले माणस नपुसंक बनावात, आणि काही नपुसंक असा शेत, जेस्नी स्वर्ग ना राज्य साठे स्वता ले नपुसंक बनायेल शे, त्या ज्या समजी सकतस, समजी जा.”
पोरस्ले आशीर्वाद
(मार्क 10:13-16; लूक 18:15-17)
13तव लोक पोरस्ले येशु कळे लयाले लागनात, कि तो तेस्ना वर हात ठेवो आणि प्रार्थना करो आणि आशीर्वाद देवोत. पण शिष्यस्नी लोकस्ले धमकाव. 14येशु नि सांग “पोरस्ले मना कळे ईवू द्या आणि तेस्ले मना नका करा, कारण त्याच लोक ज्या या पोरस सारखा विश्वास लायक आणि नम्र शेतस स्वर्ग ना राज्य मा राहतीन.” 15आणि तेस्ना वर हात ठीसन तेस्ले आशीर्वाद दिना, आणि तठून चालना ग्या.
मालदार माणुस आणि कायम ना जीवन
(मार्क 10:17-31; लूक 18:18-30)
16एक माणुस येशु कळे उना आणि तेले सांगणा हे उत्तम गुरुजी मी कोणता चांगल काम करू कि कायम ना जीवन प्राप्त करू. 17तेनी तेले सांग तू मले उत्तम काबर सांगस? उत्तम त एकच शे पण जर जीवन मा प्रवेश कराना विचार करस त आदन्या माना कर. 18तेनी तेस्ले सांग, “कोणती आज्ञा?” येशु नि सांग ह्या “कि घात करज्यात नका. 19आपला बाप व आपली माय ना आदर करज्यात आणि आपल शेजारी वर आपला सारखा प्रेम करज्यात.”
20त्या जवान नि तेले सांग, “ह्या सर्वा आदन्या मी लहानपणा पासून पायत एयेल शे.” आते मले कोणती वस्तू नि कमी शे. 21येशु नि तेले सांग जर तुले सिद्ध होण शे, त जा जे काही तुना कळे शे तेले विकीसन पैसा गरीब लोकस्ले द्या जर तुमी असा करतस, त तुमना जोळे स्वर्ग मा धन राहीन. आणि ईसन मना मांगे चालू लाग. 22पण तो जवान हई गोष्ट आयकीसन नाराज हुईसन चालना ग्या कारण तो गैरा मालदार होता.
23तव येशु नि आपला शिष्यले सांगणा कि मी तुमले खर सांगस “मालदार लोकस साठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करान गैरा कठीण शे.” 24परत तुमले सांगस, कि एक उट ना साठे सुई ना छिद्र मधून जावान सोप शे, पण एक मालदार ले परमेश्वर ना राज्य मा जावाले गैरा कठीण शे. 25हई आयकीसन शिष्यस्नी गैरा चकित हुईसन सांग, मंग कोनासाठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करासाठे वाचाले कस शक्य शे? 26येशु तेस्ना कळे देखीसन सांगणा, “हई लोकस साठे अशक्य शे पण परमेश्वर ना साठे नई, परमेश्वर ना साठे सर्व काही शक्य शे.” 27एनावर पेत्र नि तेले सांग, “आमन काय हुईन? आमी तुना शिष्य बनासाठे सर्व काही सोळी दियेल शे.” 28येशु नि तेस्ले सांग, मी तुमले खर सांगस, जव नवीन सृष्टीमा माणुस ना पोऱ्या आपली महिमा ना सिंहासन वर बठीन, तुमी बी ज्या मना मांगे एयेल शेत, बारा सिंहासन वर बठीसन इस्त्राएल देश ना बारा गोत्र वर न्याय करशात. 29आणि तुमना मधून हरेक झन घर, भाऊ-बहिण, माय-बाप, बायको, पोरस्ले, व वावरस्ले मना शिष्य होवा साठे आणि सुवार्ता जाहीर करासाठे सोळी दियेल शे, तेले शंभर पट भेटीन आणि तो कायम ना जीवन ना अधिकारी हुईन. 30ज्या आते पहिला शेतस, त्या टाईम ले आखरी होतीन, आणि काही ज्या आखरी शेतस, त्या टाईम ले पहिला होतीन.

Цяпер абрана:

मत्तय 19: AHRNT

Пазнака

Падзяліцца

Капіяваць

None

Хочаце, каб вашыя адзнакі былі захаваны на ўсіх вашых прыладах? Зарэгіструйцеся або ўвайдзіце