मत्तय 14

14
योहान बाप्तिस्मा देणार नि हत्या
(मार्क 6:14-29; लूक 9:7-9)
1त्या टाईम ले चौथा भाग ना राजा हेरोद नि त्या कामस्ना बारामा आईक ज्या येशु करत होता. 2आणि आपला सेवकस्ले सांग हवू योहान बाप्तिस्मा देणारा शे, तो मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे, हवूच कारण शे कि तेना कळे या सामर्थ्य ना कामस्ले करासाठे परमेश्वर नि शक्ती शे.
योहान नि हत्या
3कारण हेरोद आपला भाऊ फिलिप्प नि बायको हेरोदियास मुळे योहान ले धरीसन बांध, आणि बंदीगृह मा टाक. 4कारण कि योहान नि तेले सांग होत, कि तुले आपला भाऊ नि बायको ले ठेवण तुना साठे चांगल नई. 5एनासाठे तो तेले मारी टाकाना देखत होता, पण लोकस्ले घाबरत होता, कारण कि त्या तेले भविष्यवक्ता मानत होतात.
6पण हेरोद ना जन्म दिन उना हेरोदियास नि पोर उत्सव मा नाचीसन हेरोद राजा ले खुश करनी. 7एनावर राजा हेरोद नि वचन दिधा, जे काही तू मांगशी, मी तुले दिसू. 8ती आपली माय ना आयकीसन बोलणी योहान बाप्तिस्मा देणार ना डोक ताट मा मांगाळी द्या. 9राजा गैरा उदास हुईग्या, पण आपली शेप्पत आणि तठे संगे पावनास मुळे आज्ञा दिना कि देवामा येवो. 10आणि तेनी बंदीगृह मा लोकस्ले धाळीसन योहान ना डोक कापाळी टाक. 11आणि तेन डोक एक ताट मा ठेयीसन लयामा उन, आणि पोर ले देवामा उन, आणि ती पोर तेले आपली माय जोळे लीगई. 12जव योहान ना शिष्य उनात आणि तेना धळ ले उचलीसन कबर मा ठेवा. आणि जाईसन येशु ले सांग.
पाच हजार माणसस्ले खावाळ
(मार्क 6:30-44; लूक 9:10-17; योहान 6:1-14)
13जव येशु नि हय आयक, तो नाव वर चळीसन कोणती सुनसान जागा वर एकांत मा चालना ग्या, लोक हई आयकीसन नगर-नगर मधून पायी तेना मांगे चालाले लागनात. 14तेनी निघीसन एक मोठी गर्दी देखी, आणि तेस्ना वर दया करी, आणि तेस्ना आजारस्ले बरा करना.
15जव दुफार ना गैरा उशीर नंतर, तेना शिष्य तेना जोळे ईसन सांगाले लागनात, हय सुनसान जागा शे आणि संज्याकाय हुई जायेल शे, लोकस्ले धाळी दे, कि त्या वस्तीस्मा जाईसन आपला साठे खावाले विकत लेवोत. 16पण येशु नि तेस्ले सांग तेस्न जान आवश्यक नई, तुमी तेस्ले खावाले द्या. 17तेस्नी तेले सांग, आठे आमना जोळे पाच भाकरी आणि दोन मासास्ले सोळीसन आखो काहीच नई शे. 18तेनी सांग तेस्ले आठे मना आडेच लया. 19तव तेनी लोकस्ले गवत वर बसाले सांग, आणि पाच भाकरी आणि दोन मासा ले लीधा, आणि स्वर्ग कळे देखीसन धन्यवाद करना आणि भाकरी तोडीसन शिष्यस्ले दिधा, आणि शिष्यस्नी लोकस्ले. 20जव बठ्ठा खाईसन तृप्त हुई ग्यात त शिष्यस्नी उरेल भाकरीस्ना तुकळा बारा टोपल्या भरीसन उचलनात. 21आणि खाणारा बाया आणि पोरस्ले सोळीसन लोक पाच हजार ना आस-पास होतात.
येशु न पाणी वर चालन
(मार्क 6:45-52; योहान 6:15-21)
22तव तेनी शिष्यस्ले लवकर नाव वर चडाले विवश कर कि त्या तेना तून पयले त्या पार जावोत, जठलोंग तो लोकस्ले धाळस. 23आणि लोकस्ले धाळा नंतर, तो पहाळ वर प्रार्थना कराले आल्लग चळी ग्या. आणि जव संज्याकायले तो तठे एखटा जमीन वर होता. 24त्या टाईम ले नाव समुद्र ना किनारा पासून गैरी दूर होती, आणि लाठास कण ईकळे तिकळे झोला मारत होती, कारण कि हवा समोरून येत होती. 25आणि येशु रात ना चौथा पहरले समुद्र वर चालत तेस्ना कळे उना. 26शिष्य तेले समुद्र वर चालतांना देखीसन घाबरी ग्यात, आणि सांगाले लागनात, “हवू सैतान शे,” आणि घाबरीसन ओरडाले लगनात. 27तव येशु नि लगेच तेस्ना संगे बोलना, आणि सांग, धीर धरा, मी शे, घाबरू नका. 28पेत्र नि तेले उत्तर दिधा, “हे प्रभु, जर तू येशुच शे, त मले आपला जोळे पाणी वर चालीसन येवानी आज्ञा दे.” 29तेनी सांग, ये तव पेत्र नाव वरून उतरीसन येशु जोळे जावाले पाणी वर चालाले लागणा. 30पण हवाले देखीसन घाबरी ग्या आणि बुळू लागणा तेनी वरळीसन सांगणा, हे प्रभु, मले वाचाळ. 31येशु नि आपला हात पुळे करीसन पेत्र ले पकळी लीधा आणि तेले बाहेर निघाले मदत करी, आणि तेले सांग, हे अविश्वासी, तुनी काब संशय धरा? 32जव त्या नाव वर चळी ग्यात, त हवा थांबी गई. 33एनावर ज्या नाव वर होतात, तेस्नी येशु ना जोळे ईसन तेले नमन करीसन सांगणात, खरज तू परमेश्वर ना पोऱ्या शे.
गनेसरत मा रोगीस्ले चांगल करन
(मार्क 6:53-56)
34त त्या गनेसरत मा उनात. 35आणि तडला लोकस्नी तेले वयखीसन पुरा जिल्हा मा सांगाले धाळ, आणि सर्वा आजारीस्ले तेना जोळे लयनात. 36आणि तेनाशी विनंती कराले लागनात कि तो तेस्ले आपला वस्त्र ना गोंड्याले फक्त हात लाऊ दे, आणि जीतलास्नी तेले हात लावत होतात सर्वा बरा हुई ग्यात.

Цяпер абрана:

मत्तय 14: AHRNT

Пазнака

Падзяліцца

Капіяваць

None

Хочаце, каб вашыя адзнакі былі захаваны на ўсіх вашых прыладах? Зарэгіструйцеся або ўвайдзіце