1
रोमकरांना 12:2
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
MACLBSI
देवाची इच्छा काय आहे म्हणजेच त्याच्या दृष्टीने चांगले, ग्रहणीय व परिपूर्ण काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नूतनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.
Параўнаць
Даследуйце रोमकरांना 12:2
2
रोमकरांना 12:1
बंधुजनहो, मी देवाच्या महान करुणेमुळे तुम्हांला आवाहन करतो की, तुम्ही आपली शरीरे सजीव, पवित्र व ग्रहणीय यज्ञ म्हणून देवाला समर्पित करावीत, ही खरी उपासना आहे.
Даследуйце रोमकरांना 12:1
3
रोमकरांना 12:12
आशेने हर्षित व्हा. संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर राहा.
Даследуйце रोमकरांना 12:12
4
रोमकरांना 12:21
वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर चांगुलपणाने वाइटाला जिंक.
Даследуйце रोमकरांना 12:21
5
रोमकरांना 12:10
बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा, तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना
Даследуйце रोमकरांना 12:10
6
रोमकरांना 12:9
प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाइटाचा वीट माना, चांगुलपणाला चिकटून राहा.
Даследуйце रोमकरांना 12:9
7
रोमकरांना 12:18
सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा.
Даследуйце रोमकरांना 12:18
8
रोमकरांना 12:19
प्रियजनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा धर्मशास्त्रलेख आहे: ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन’, असे प्रभू म्हणतो.
Даследуйце रोमकरांना 12:19
9
रोमकरांना 12:11
श्रम करा; आळस करू नका. समर्पित वृत्तीने प्रभूची सेवा करा.
Даследуйце रोमकरांना 12:11
10
रोमकरांना 12:3
मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळे मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःचे मूल्यमापन करा.
Даследуйце रोमकरांना 12:3
11
रोमकरांना 12:17
वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे चांगले आहे, ते करण्याकडे लक्ष ठेवा.
Даследуйце रोमकरांना 12:17
12
रोमकरांना 12:16
परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेऊ नका, तर लीन वृत्तीच्या लोकांच्या सहवासात रहा. तुम्ही दुसऱ्यांपेक्षा अधिक चांगले असल्याचा दावा करू नका.
Даследуйце रोमकरांना 12:16
13
रोमकरांना 12:20
उलटपक्षी, तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे. तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील.
Даследуйце रोमकरांना 12:20
14
रोमकरांना 12:14-15
तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, होय, आशीर्वाद द्या; शाप देऊ नका. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा.
Даследуйце रोमकरांना 12:14-15
15
रोमकरांना 12:13
पवित्र जनांच्या गरजा भागवा. आतिथ्य करण्यात तत्पर असा.
Даследуйце रोमकरांना 12:13
16
रोमकरांना 12:4-5
जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत व त्या सर्व अवयवांची कामे निरनिराळी आहेत, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत.
Даследуйце रोमकरांना 12:4-5