योहान 3
3
येशु अनी निकदेम
1परूशी लोकसपैकी निकदेम नावना एक माणुस व्हता, तो यहूदी लोकसना एक अधिकारी व्हता. 2तो एक रातले येशुकडे ईसन त्याले बोलना, “गुरजी, तुम्हीन देवकडतीन येल शिक्षक शेतस हाई माले माहीत शे. कारण ह्या ज्या चमत्कार तुम्हीन करतस त्या देवसंगे राहवाशिवाय कोणाघाईच करता येवाव नही.”
3येशुनी त्याले उत्तर दिधं, “मी तुले खरंखरं सांगस; जोपावत नविन जन्म लेस नही तोपावत कोणलेच देवनं राज्य दखता येस नही.”
4निकदेम त्याले बोलना, “म्हतारा माणुस पुन्हा कसा जन्म लेवु शकस? त्यानाघाई त्यानी मायना गर्भमा दुसरींदाव जावाई का अनं जन्म लेवाई का?”
5येशुनी उत्तर दिधं की, “मी तुले खरंखरं सांगस, पाणीघाई अनी आत्माघाई जन्म लेवाशिवाय कोणलेच देवना राज्यमा प्रवेश करता येत नही. 6माणुस मायबापसपाईन शरीरघाई जन्म लेस, अनी आत्माकडतीन आत्मामा जन्म लेस. 7तुमले नविन जन्म लेना पडी हाई मी तुले सांगं, म्हणीन आश्चर्य मानु नको. 8वारा पाहिजे तिकडे वाहस; अनी त्याना आवाज तु ऐकस, पण तो कोठेन येस अनं कोठे जास हाई तुले कळस नही. जो कोणी आत्मापाईन जन्मेल शे त्यानं असच शे.”
9निकदेमनी त्याले ईचारं, “या गोष्टी कशा होतीन?” 10येशुनी त्याले उत्तर दिधं, “तु इस्त्राएल लोकसना गुरू” राहीन तुले या गोष्टी समजतस नही का? 11मी तुले खरंखरं सांगस; की जे आमले माहित शे ते आम्हीन सांगतस अनी जे दखेल शे त्याबद्दल साक्ष देतस, अनी तुम्हीन आमनी साक्ष ऐकतस नही. 12मी पृथ्वीवरल्या गोष्टी तुमले सांगा नंतर तुम्हीन ईश्वास करतस नही; तर मंग स्वर्गमाधल्या गोष्टी तुमले सांगा नंतर तुम्हीन कशा ईश्वास करशात? 13स्वर्गमाईन येल मनुष्यना पोऱ्या यानाशिवाय कोणी बी स्वर्गमा वर जायेल नही.
14जसं मोशेनी ओसाड प्रदेशमा पितळी सापले खांबवर उंच करं, त्यानामायकच आवश्यक शे की मनुष्यना पोऱ्याले उंच कराले पाहिजे, 15याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेई त्याले त्यानामा सार्वकालिक जिवन भेटी. 16देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी. 17देवनी पोऱ्याले जगना न्यायनिवाडा कराले नही, तर त्यानाद्वारे जगनं तारण व्हावं म्हणीन धाडेल शे. 18जो त्यानावर ईश्वास ठेवस त्यानावर न्यायनिवाडानी येळ येवाव नही; पण जो ईश्वास ठेवस नही त्यासना न्यायनिवाडा पहिलेच व्हयेल शे, कारण त्यासनी देवना एकुलता एक पोऱ्याना नाववर ईश्वास नही ठेवा. 19न्यायना निवाडा हाऊच शे की; जगमा प्रकाश येल शे पण लोकसनी प्रकाशपेक्षा अंधारवर जास्त प्रेम करं, कारण त्यासना कामे दुष्ट व्हतात. 20जो कोणी दुष्ट कामे करस तो प्रकाशना व्देष करस, अनी आपली दुष्ट कामे दिसाले नको म्हणीन प्रकाशमा येस नही. 21पण जो सत्यवर चालस तो प्रकाशकडे येस, याकरता की आपला कामे देवमा करेल शेतस हाई उघड व्हवाले पाहिजे.
येशु अनी बाप्तिस्मा करनारा योहान
22यानंतर येशु अनी त्याना शिष्य यहूदीया प्रांतमा वनात, जठे तो त्यासनासंगे राहिसन बाप्तिस्मा करे. 23योहान बी शालिमाजोडेना एनोन आठे बाप्तिस्मा करे, कारण तठे खुप पाणी व्हतं. लोके त्यानाजोडे जायेत अनी तो त्यासले बाप्तिस्मा दे. 24#मत्तय १४:३; मार्क ६:१७; लूक ३:१९,२०कारण तोपावत योहानले कैदखानामा टाकेल नव्हतं.
25योहानना काही शिष्यसना एक यहूदीसंगे शुध्दीकरणना रितीरिवाजवरतीन वाद व्हयना. 26मंग त्या योहानकडे जाईसन त्याले बोलणात, गुरजी, यार्देनना पलीकडे जो तुमनासंगे व्हता, ज्यानाबद्दल तुम्हीन साक्ष दिधी व्हती? दखा, तो बाप्तिस्मा दि राहिना अनी सर्व लोके त्यानाजोडे जाई राहिनात!
27योहाननी उत्तर दिधं, “जोपावत कोणता बी मनुष्यले स्वर्गमातीन काही देतस नही तोपावत त्याले काहीच भेटस नही. 28#योहान १:२०तुम्हीन स्वतः मनी साक्ष देतस, की मी सांगेल व्हतं, मी ख्रिस्त नही शे, पण त्यानापुढे माले धाडेल शे. 29नवरदेव तोच शे ज्यानी नवरी शे; पण नवरदेवना मित्र, जो उभं राहिन त्यानं ऐकस, जवय तो नवरदेवना आवाज ऐकस तवय त्याले भलता आनंद व्हस. असाच मना आनंद पुर्ण व्हयेल शे. 30त्यानं महत्व वाढाले पाहिजे अनं मनं महत्व कमी व्हवाले पाहिजे हाई व्हणं अवश्य शे.”
स्वर्गमाईन येणारा तो कोण शे
31जो वरतीन येस तो सर्वासपेक्षा श्रेष्ठ शे. जो पृथ्वीपाईन शे तो पृथ्वीना शे अनं तो पृथ्वीन्या गोष्टी बोलस, पण जो स्वर्गमातीन येस तो सर्वासपेक्षा उंच शे. 32जे काही त्यानी दखेल अनी ऐकेल शे तो त्यानीच साक्ष देस, पण कोणीच त्यानी साक्षना स्विकार करस नही. 33ज्यानी त्याना साक्षना स्विकार करेल शे त्यानी हाई गोष्टवर शिक्का मारेल शे की, देव सत्य शे. 34कारण ज्याले देवनी धाडं तो देवना वचने बोलस; कारण तो आत्मा मोजी मापीसन देस नही. 35#मत्तय ११:२७; लूक १०:२२बाप पोऱ्यावर प्रेम करस अनी त्यानी सर्वा काही त्याना हातमा देयल शे. 36जो पोऱ्यावर म्हणजे मनावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन शे; पण जो पोऱ्याले म्हणजे माले मानस नही त्याले जिवन दखाव नही, पण परमेश्वरना प्रकोप त्यानावर राही.
The Old Testament Books in Ahirani Language © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025