छळात भितीचा सामना करणे预览

छळात भितीचा सामना करणे

7天中的第3天

भितीच्या वेळेस विजय

आपल्या सर्वांना वाटणा-या भिती पैकी सर्वात भितीदायक भिती कदाचीत मरणाची भिती आहे. मरणाची भिती विशेषतः जेव्हा आपण छळाच्या परिस्थितीचा सामना करतो तेव्हा ते आपली शांती भंग करू शकते. मरण आपला शत्रू नाही कारण येशूने वधस्तंभावर त्याचा पराभव केला. आपण मरणाची भिती बाळगू नये कारण ख्रिस्त येशू मध्ये आपण जे आहोत त्या आपल्यावर त्याला अधिकार नाही. आपण स्वतःला सतत आठवण करून दिली पाहिजे की आपल्या शरीराचा छळ होत असला तरी मरण आपल्याला येशूसाठी निर्भय असे जीवन जगण्यापासून रोखू शकत नाही.

पतमस बेटावर हद्दपार केल्या नंतर,योहानाला अनेक त्रासदायक अनुभव आले. कदाचीत त्याच्या सर्वात खोल मृत्यूच्या भितीच्या मध्ये त्याला ख्रिस्ताच्या संपूर्ण वैभवाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. त्या अद्भूत दृष्याने योहानाला येशूच्या पायाजवळ नतमस्तक होण्यासाठी प्रेरीत केले. परंतू येशू कोण आहे याची त्याने त्याला आठवण करून दिली! त्याने केवळ मृत्यूचा पराभव केला नाही तर त्याच्याकडे मरण व अधोलोकाच्या चाव्या होत्या. म्हणून जेव्हा तुम्ही छळाच्या आणि मृत्यूच्या भितीचा सामना करता तेव्हा ज्याने त्याच्यावर विजय मिळविला आणि ज्याच्या कडे चाव्या आहेत त्याची आठवण ठेवा.

वचनबध्द व्हा आणि प्रार्थना कराः

मरणाची भिती तुम्हाला घाबरविते काय?ज्याच्या कडे मृत्यूच्या व अधोलोकाच्या चाव्या आहेत त्याची तुम्ही स्वतःला आठवण करून देऊ शकता काय,

प्रार्थना करूया की छळाच्या सर्वात गडद क्षणात भिती आपल्यावर हावी होणार नाही आणि आपण ख्रिस्त येशूच्या ठायी कोण आहोत याची आपल्याला आठवण होईल,‘‘मरणाची नांगी मोडली आहे.’’

读经计划介绍

छळात भितीचा सामना करणे

जेव्हा कोणाचा छळ होतो तेव्हा भिती ही सर्वात शक्तिशाली भावना असते. हल्ले, तुरूंगवास, मंडळ्या बंद करणे आणि प्रिय व्यक्तिंचे व सह विश्वासणा-यांचे विश्वासामूळे मरण होणे या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या ख्रिस्ती विश्वासाच्या प्रवासात पुढे जाण्यासाठी भितीदायक वाटण्यास व असहाय वाटण्यास कारण ठरू शकतात. जर तुम्हाला आता त्याची भिती वाटत असेल तर ही वाचन योजना जेव्हा तुम्ही छळाचा सामना कराल त्यासाठी तयारी करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे.

More