चिंतेला तिच्या स्वतःच्या खेळात पराभूत करणे预览

चिंतेला तिच्या स्वतःच्या खेळात पराभूत करणे

4天中的第4天

लांब श्वास घ्या

आपल्या मानवी शरीरात एक स्वायत्त मज्जासंस्था आहे ज्यामध्ये अनुकंपी आणि परानुकंपी मज्जासंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या दोन उप-प्रणाली आहेत. पहिली प्रणाली आपल्या चिंताग्रस्त प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवते जे की संघर्ष, भरारी आणि भीती यंत्रणे आहेत. या प्रतिक्रियांमुळे हृदय गती, उच्च रक्तदाब आणि कोर्टिसोलचा स्राव वाढतो. दुसरी प्रणाली, परानुकंपी मज्जासंस्था ही चिंताग्रस्त प्रतिसादाचा प्रतिकार करण्यासाठी आराम आणि विश्रांतीची यंत्रणा आहे. ही तेव्हा सक्रीय होते जेव्हा आपण लांब श्वास घेतो, आपण सामान्यपणे छातीतून श्वास घेतो तसे नव्हे तर आपल्या श्वासपटल पासून श्वास घेतो. त्यासाठी आपण मनापासून श्वास घेणे आणि श्वासोच्छ्वास करणे आवश्यक आहे जेणेकरून कोणताही धोका नसल्यामुळे शांत होण्यासाठी आणि आराम करण्यासाठी मेंदूच्या अमिगडाला प्रदेशात एक संकेत पाठविला जातो.

हा लघु-विज्ञान धडा का? हे सिद्ध झाले आहे की लांब दीर्घ श्वास घेणे आणि चिंताग्रस्त प्रतिसादा कमी होणे यात थेट संबंध आहे. जर आपल्याला भीतीचा झटका आला असेल तर आपणास हे समजेल की आपल्यास येणाऱ्या सर्व लक्षणांसह, आपला सल्लागार आपल्याला आपल्या शरीरास शांत करण्यासाठी आपल्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करण्यास शिकवेल. पृथ्वीवरील आपल्यापैकी प्रत्येकाला एका कुशल निर्मात्याद्वारे तयार केले आहे ज्याने कोणतीही चूक केली नाही. जेव्हा त्याने आपल्याला निर्माण केले तेव्हा त्याने आपल्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास टाकला आणि मृत्यूमुळे आपले डोळे मिटेपर्यंत आणि श्वास आपले शरीर सोडत नाही तोपर्यंत हेच आपल्याला टिकवते. येशूला वैयक्तिकपणे आपला तारणहार म्हणून ओळखतांना आणि आपल्या जीवनात त्याची गरज ओळखून आपण पवित्र आत्म्याला आमंत्रित करतो जो इब्रीमध्ये रुआच हकोदेश आहे. रुआच ह्या शब्दाचा अर्थ आहे “आत्मा” म्हणजे “वारा” किंवा “श्वास”. पुनरुत्थानानंतर येशू त्याच्या शिष्यांना भेटला तेव्हा त्याने त्यांच्यावर श्वास फुंकिला आणि त्यांना पवित्र आत्मा ग्रहण करण्यास सांगितले. जुन्या करारात यहेज्केल संदेष्ट्याला मृत्युच्या सुक्या हाडांच्या दरीचे दर्शन दिले होते. त्याला या हाडांपुढे(जे इस्राएल लोकांचे प्रतिनिधित्व करतात)  भविष्यवाणी करण्यास आणि परमेश्वरासाठी सैन्य उभे करतात सांगितले जाते. त्यानंतर त्याला विशेषत: पृथ्वीच्या 4 वाऱ्यांपासून हाडांमध्ये श्वास येण्यास आज्ञा देण्यास सांगितल्या जाते जेणेकरून ते जीवंत होऊ शकतील. आपल्या अस्तित्वासाठी आपल्या जीवनाचा श्वास महत्त्वपूर्ण आहे हे स्पष्ट नाही का? जेव्हा चिंता आपल्याला पकडते, तेव्हा ती आपल्याला अर्धांगवायू करते आणि कधीकधी आपल्याला जीवनातील जीवाला गळफास करून मारून टाकण्याची धमकी देते. हीच ते वेळ आहे जेव्हा आपण पवित्र आत्म्याचे मंदिर असलेल्या आपल्या शरीरावर पुन्हा आपला हक्क स्थापित करतो. आपण घेत असलेला प्रत्येक श्वास हा आपल्या जीवन देणाऱ्या पवित्र आत्म्याकडून प्राप्त होतो आणि आपल्या शरीरातून बाहेर निघणारा प्रत्येक श्वास देवाकडून नसलेल्या प्रत्येक गोष्टीला बाहेर काढणे आहे. पुढच्या वेळी आपले विचार नियंत्रणाबाहेर येण्यास प्रारंभ करतील, तेव्हा आपल्या मनावर असलेले विरामाचे बटन दाबा आणि देवामध्ये लांब खोलवर श्वास घ्या (स्तोत्र 42 एमएसजी आवृत्ती) आणि देवाचे आपल्यावर असलेल्या प्रेमाला आपल्याला धुण्याची परवांगी द्या आणि देवाच्या शांतीला आपल्या कंटाळलेल्या आत्म्याला संतृप्त करू द्या. 

प्रार्थनाः

प्रिय प्रभू,

मी मागतो की माझ्या शरीरातील प्रत्येक श्वासाने मी तुझी स्तुती करावी आणि तुला योग्य अशी सर्व महिमा द्यावी. एका संपूर्ण दुसर्‍या स्तरावर तुझा अनुभव घेण्यास आणि येशूमध्ये मला जे वचन दिले आहे त्या संपत्तीची मी पूर्णता अनुभवू शकेन यासाठी माझी मदत कर. प्रभू मी चिंताग्रस्त असण्या पासून संपूर्ण स्वातंत्र्य आणि उपचार अनुभवू शकेल असे तू होऊ दे. मी चिंताग्रस्त होतो तेव्हा प्रत्येक वेळी मी तुला माझ्या परिस्थितीत आमंत्रित करेल आणि तू माझी काळजी घेशील असा विश्वास ठेवील असे तू होऊ दे. 

हे सर्व मी येशूच्या नावाने मागतो

आमेन.


计划天: 3

读经计划介绍

चिंतेला तिच्या स्वतःच्या खेळात पराभूत करणे

चिंता तिच्या सर्व प्रकारांद्वारे आपल्याला दुर्बल करणारी अशी ठरू शकते. कारण ती आपले संतुलन घालवू शकते आणि आपल्याला भीतीमध्ये बांधून ठेवू शकते. हा कथेचा शेवट नाही, कारण येशूमध्ये आपल्याला स्वातंत्र्य आणि संघर्षावर मात करण्याची कृपा मिळते. आपण त्यावर केवळ मात करू शकत नाही, परंतु आपण त्यासाठी अधिक चांगले केले जाऊ शकतो देवाच्या वचनाचे आणि आश्वसन देणाऱ्या त्याच्या सतत उपस्थितीसाठी त्याचे आभार.

More