ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका预览

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

40天中的第31天

एक्ट्सच्या नंतरच्या भागांमध्ये, पॉलला याची जाणीव होते की असे काही ज्यू ख्रिस्ती आहेत जे दावा करत आहेत की ज्यू नसलेल्या ख्रिस्तींनी येशू चळवळीचा एक भाग  म्हणून ज्यू व्हावे. (सुंता, शब्बाथ, आणि कोशर खाण्याच्या नियमांचे पालन करून) पण पॉल आणि बर्नबास याना हे पूर्णपणे अमान्य असते, आणि ते जेरुसलेममधील नेत्यांच्या प्रशासकीय मंडळाकडे यावर तोडगा काढण्यासाठी चर्चासत्र घेतात. दरम्यान तिथे, पीटर, पॉल, आणि जेम्स (येशूचा भाऊ) शास्त्रवचनांकडे आणि ईश्वराच्या योजनेमध्ये सगळे देश आहेत या  त्यांच्या अनुभवाकडे लक्ष वेधून घेतात. त्यावेळी परिषद एक महत्वपूर्ण निर्णय देते आणि स्पष्ट करते की ज्यू नसलेल्या ख्रिस्तींनी मूर्तिपूजक मंदिरांच्या त्यागात भाग घेणे थांबवले पाहिजे, वांशिक ज्यू ओळख स्वीकारणे किंवा तोराहच्या विधीकायद्यांचे आणि रुढींचे पालन करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे नाही. येशू हा एक ज्यू मसिहा आहे, पण तो सगळ्या देशांचा वृद्धिंगत झालेला राजाही आहे. ईश्वराच्या राज्याचे सदस्यत्व हे वांशिक किंवा कायद्याच्या आधारावर नसते पण येशूचे आज्ञापालन आणि त्याच्यावर विश्वास या साध्या गोष्टींमध्ये असते. 


读经计划介绍

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More