मत्तय 1

1
येशु ख्रिस्तनी वंशावळी
(लूक ३:२३-२८)
1येशु ख्रिस्त जो दावीद राजाना पोऱ्या, जो अब्राहामना पोऱ्या ह्याना वंशावळीनं पुस्तक.
2अब्राहामले इसहाक नावना पोऱ्या व्हयना; इसहाकले याकोब; याकोबले यहुदा; अनं त्याना भाऊ व्हयनात; 3यहुदाले तामारेपाईन पेरेस अनं जेरह व्हयनात; पेरेसले हेस्रोन व्हयना; हेस्रोनले अराम व्हयना; 4अरामले अम्मीनादाब; अम्मीनादाबले नहशोन; नहशोनले सल्मोन; 5सल्मोनले रहाबेपाईन बवाज; बवाजाले रूथपाईन ओबेद; ओबेदाले इशाय;
6अनं इशायले; दावीद राजा व्हयना; जी पहिले उरीयानी बायको व्हती; तिनापाईन दावीदले शलमोन व्हयना; 7शलमोनले रहाबाम; रहबामले अबीया; अबीयाले आसा; 8आसाले यहोशाफाट; यहोशाफाटले योराम; योरामले उज्जीया; 9उज्जीयाले योथाम; योथामले आहाज; आहाजले हिज्कीया; 10हिज्कीयाले मन्नशे; मन्नशेला आमोन; आमोनले योशीया; 11अनी बाबेलले देशांतर व्हयनं तवय योशीयाले यखन्या अनं त्याना भाऊ व्हयनात.
12बाबेलले देशांतर व्हयनं तवय यखन्याले शल्तीएल व्हयना; शल्तीएलले जरूब्बाबेल; 13जरूब्बाबेलले अबीहूद; अबीहूदले एल्याकीम; एल्याकीमले अज्जुर; 14अज्जुरले सादोक; सादोकले याखीम; याखीमले एलीहुद; 15एलीहुदले एलाजार; एलाजारले मत्तान; मत्तानले याकोब; 16अनी याकोबले योसेफ व्हयना. जो मरीयाना नवरा व्हता, अनी मरीयाले येशु व्हयना ज्याले ख्रिस्त म्हणतस.
17याप्रमाणे अब्राहामपाईन दावीदपावत सर्व मिळीसन चौदा पिढ्या; दावीदपाईन बाबेलले देशांतर करं तोपावत चौदा पिढ्या; अनी बाबेलले देशांतर व्हवनं तवयपाईन ख्रिस्तपावत चौदा पिढ्या.
येशुना जन्म
(लूक २:१-७)
18 # लूक १:२७ येशुना जन्म असा व्हयना की, त्यानी माय मरीया हिनी योसेफसंगे मांगनी व्हयेल व्हती, त्यासनं लगीन व्हवाना पहिले पवित्र आत्माकडतीन तिले दिवस राही गयात. अस दखायी वनं 19तिना नवरा योसेफ हाऊ एक धार्मीक माणुस व्हता अनं तिनी बदनामी व्हवाले नको म्हणीसन तिले चुपचाप सोडी देवानी त्यानी ईच्छा व्हती. 20जवय तो हाऊ ईचार करीच राहींता ईतलामा एक प्रभुना स्वर्गदूतनी त्याले सपनमा दर्शन दिसन सांगं, हे, “योसेफ दावीदना पोऱ्या, तु मरीयाले बायको बनाडाले घाबरू नको, कारण तिना पोटमा जो गर्भ शे, तो पवित्र आत्माकडतीन शे. 21#लूक १:३१ती पोऱ्याले जन्म दि त्यानं नाव तु येशु ठेव, कारण तोच आपला लोकसले पापपाईन वाचाडी.”
22हाई सर्व यानाकरता व्हयनं, की, प्रभुनी संदेष्टासनाद्वारा जे सांगेल व्हतं ते पुर्ण व्हवाले पाहिजे ते अस. 23दखा, “कुमारी गर्भवती व्हई अनं तिले पोऱ्या व्हई, अनी त्याले इम्मानुएल हाई नाव देतीन.” ह्या नावना अर्थ “आमनासंगे देव असा शे.”
24तवय झोपमाईन ऊठानंतर प्रभुना दूतनी जशी आज्ञा करी, तसं योसेफनी करं त्यानी आपली बायकोना स्विकार करा. 25#लूक २:२१जोपावत तिनी पोऱ्याले जन्म दिधा नही, तोपावत मरीयाना जोडे तो निजना नही, जवय पोऱ्या व्हयना तवय त्यानी त्यानं नाव येशु ठेवं.

Podkreślenie

Udostępnij

Kopiuj

None

Chcesz, aby twoje zakreślenia były zapisywane na wszystkich twoich urządzeniach? Zarejestruj się lub zaloguj

YouVersion używa plików cookie, aby spersonalizować twoje doświadczenia. Korzystając z naszej strony, wyrażasz zgodę na używanie przez nas plików cookie zgodnie z naszą Polityką prywatności