YouVersion लोगो
सर्च आयकॉन

सफन्या 1:2-6 - Compare All Versions

सफन्या 1:2-6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परमेश्वर असे म्हणतो की, “मी पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा पूर्णपणे नाश करीन. मी मनुष्य व प्राणी यांचा नाश करीन; मी आकाशांतले पक्षी व समुद्रातील मासे आणि दुष्ट व त्याचे अडखळणे नष्ट करीन. मनुष्य पृथ्वीवरून मी नाहीसा करून टाकीन, असे परमेश्वर म्हणतो. मी आपला हात यहूदावर आणि यरूशलेमवासीयांवर लांब करीन व बआलमूर्तीचे उरलेले आणि याजकांमधील मूर्तीपूजक लोक यांचे नाव मी या जागेवरून नष्ट करीन. जे घरावर स्वर्गातल्या सैन्यांचे भजन करतात ते, जे आणि परमेश्वराचे भजन करतात व त्याची शपथ घेतात व आपल्या मिल्कोमाची ही शपथ वाहतात, आणि जे परमेश्वरास अनुसरण्यापासून मागे फिरले आहेत, आणि त्यांनी परमेश्वराचा शोध घेतला नाही व त्याचे मार्गदर्शन घेतले नाही, त्यांना मी या स्थानातून नष्ट करून टाकीन.”

सामायिक करा
सफन्या 1 IRVMAR

सफन्या 1:2-6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“मी पृथ्वीतलावरून सर्वकाही झटकून नाहीसे करेन.” असे याहवेह जाहीर करतात. “मी माणसे आणि जनावरे दोन्हीही नष्ट करेन; मी आकाशातील पक्षी नष्ट करेन आणि समुद्रातील मासेही— त्या मूर्ती ज्या दुष्टाच्या अडखळण्याचे कारण बनते.” याहवेह जाहीर करतात, “जेव्हा मी पृथ्वीवरून सर्व मानवजातीला नष्ट करेन, तेव्हा मी यहूदीयातील आणि यरुशलेम येथील सर्व रहिवाशांच्या विरुद्ध माझा हात उगारेन. या ठिकाणावरील बआलच्या सर्व शेष उपासकांचा मी नाश करेन प्रत्येक मूर्तिपूजक पुजार्‍यांच्या नावाचा— जे त्यांच्या घरांच्या धाब्यांवर जातात आणि आकाशातील नक्षत्रांना नमन करतात. जे याहवेहला नमन करून त्यांची शपथ घेतात, आणि मोलेख दैवताचीही शपथ घेतात, जे याहवेहचे अनुसरण करण्यापासून मागे फिरले आहेत आणि जे याहवेहचा शोध घेत नाहीत वा त्यांची इच्छा जाणून घेत नाहीत.”

सामायिक करा
सफन्या 1 MRCV

सफन्या 1:2-6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

“मी भूपृष्ठावरून सर्वकाही निखालस नाहीसे करीन,” असे परमेश्वर म्हणतो. “मी मनुष्य व पशू नष्ट करीन; मी आकाशातले पक्षी, समुद्रातले मासे, दुर्जन व त्यांचे अडथळे नाहीतसे करीन; भूपृष्ठावरून मानव नाहीतसे करीन,” असे परमेश्वर म्हणतो. “मी आपला हात यहूदावर, यरुशलेमेच्या सर्व रहिवाशांवर चालवीन; ह्या स्थलांतून बआलमूर्तीचे शेष नाहीतसे करीन, आणि मूर्तींचे पुजारी व याजक ह्यांचे नावही नाहीसे करीन; जे धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करतात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिलकोम मूर्तीचीही1 शपथ वाहतात, जे परमेश्वरापासून पराङ्मुख झाले आहेत, ज्यांनी परमेश्वराचे चरण धरले नाहीत व त्याचा शोध केला नाही, त्यांना मी नष्ट करीन.”

सामायिक करा
सफन्या 1 MARVBSI