YouVersion लोगो
सर्च आयकॉन

सफ. 1:2-6

सफ. 1:2-6 IRVMAR

परमेश्वर असे म्हणतो की, “मी पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा पूर्णपणे नाश करीन. मी मनुष्य व प्राणी यांचा नाश करीन; मी आकाशांतले पक्षी व समुद्रातील मासे आणि दुष्ट व त्याचे अडखळणे नष्ट करीन. मनुष्य पृथ्वीवरून मी नाहीसा करून टाकीन, असे परमेश्वर म्हणतो. मी आपला हात यहूदावर आणि यरूशलेमवासीयांवर लांब करीन व बआलमूर्तीचे उरलेले आणि याजकांमधील मूर्तीपूजक लोक यांचे नाव मी या जागेवरून नष्ट करीन. जे घरावर स्वर्गातल्या सैन्यांचे भजन करतात ते, जे आणि परमेश्वराचे भजन करतात व त्याची शपथ घेतात व आपल्या मिल्कोमाची ही शपथ वाहतात, आणि जे परमेश्वरास अनुसरण्यापासून मागे फिरले आहेत, आणि त्यांनी परमेश्वराचा शोध घेतला नाही व त्याचे मार्गदर्शन घेतले नाही, त्यांना मी या स्थानातून नष्ट करून टाकीन.”

सफ. 1 वाचा

ऐका सफ. 1