स्तोत्रसंहिता 22:1-3 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 22:1-3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? मला तारायला आणि माझ्या वेदनांचा शब्द ऐकायला तू दूर का आहेस? माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस, आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही. तरी तू पवित्र आहेस, जो इस्राएलाच्या स्तवनामध्ये वसतोस.
स्तोत्रसंहिता 22:1-3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला? मला वाचविण्यास तुम्ही एवढे दूर का राहिले, माझ्या विव्हळण्याची आरोळी तुम्हापासून दूर का? माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही, रात्री पण मला कोणताही विसावा नाही. तरीपण तुम्ही पवित्र आहात; इस्राएलाच्या स्तवनांवर तुम्ही विराजमान आहात.
स्तोत्रसंहिता 22:1-3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस. माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस; रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही. तरीपण, हे इस्राएलाच्या स्तवनात वसणार्या, तू पवित्र आहेस.