YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 16:10-13

लूक 16:10-13 MRCV

“जर तुम्ही अगदी लहान गोष्टींत विश्वासू राहिला तर पुष्कळ गोष्टींत विश्वासू असाल, जर कोणी अगदी लहान गोष्टीत अप्रामाणिक राहिला तर पुष्कळ गोष्टीत अप्रामाणिक असेल. तुम्ही ऐहिक संपत्ती हाताळण्यासंबधी प्रामाणिक नसाल, तर खरी संपत्ती कोण तुम्हाला सोपवून देईल? तुम्ही इतर लोकांच्या संपत्ती संबंधी विश्वासू नसाल, तर तुम्हाला स्वतःची संपत्ती कोण देईल? “कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसर्‍यावर प्रीती कराल किंवा एकाला समर्पित असाल आणि दुसर्‍याला तुच्छ मानाल. तुम्हाला परमेश्वराची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही.”

संबंधित व्हिडिओ