YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 16:10-13

लूक 16:10-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

एखाद्यावर थोडासा विश्वास टाकणे शक्य असेल तर त्याच्यावर जास्त विश्वास टाकणे शक्य आहे व जो कोणी थोड्या गोष्टींविषयी अन्यायी आहे तो जास्त गोष्टींविषयी अन्यायी राहील. म्हणून जर तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू नाही, तर मग खऱ्या धनाविषयी तुमच्यावर कोण विश्वास ठेवील? जे दुसऱ्याचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हास कोण देईल? कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो राग करील व दुसऱ्यावर तो प्रीती करील किंवा एकाला तो धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करू शकत नाही.”

सामायिक करा
लूक 16 वाचा

लूक 16:10-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“जर तुम्ही अगदी लहान गोष्टींत विश्वासू राहिला तर पुष्कळ गोष्टींत विश्वासू असाल, जर कोणी अगदी लहान गोष्टीत अप्रामाणिक राहिला तर पुष्कळ गोष्टीत अप्रामाणिक असेल. तुम्ही ऐहिक संपत्ती हाताळण्यासंबधी प्रामाणिक नसाल, तर खरी संपत्ती कोण तुम्हाला सोपवून देईल? तुम्ही इतर लोकांच्या संपत्ती संबंधी विश्वासू नसाल, तर तुम्हाला स्वतःची संपत्ती कोण देईल? “कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसर्‍यावर प्रीती कराल किंवा एकाला समर्पित असाल आणि दुसर्‍याला तुच्छ मानाल. तुम्हाला परमेश्वराची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही.”

सामायिक करा
लूक 16 वाचा

लूक 16:10-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाहीत तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल? आणि जे दुसर्‍यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाहीत तर जे आपले आहे ते तुम्हांला कोण देईल? कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही; कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्‍यावर प्रीती करील; अथवा एकाला धरून राहील व दुसर्‍याला तुच्छ मानील. तुम्हांला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही.”

सामायिक करा
लूक 16 वाचा

लूक 16:10-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू आहे तो पुष्कळाविषयीही विश्वासू आहे आणि जो अगदी थोडक्याविषयी अप्रामाणिक आहे तो पुष्कळाविषयीही अप्रामाणिक आहे. म्हणून जर तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही, तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल? तसेच जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही, तर जे तुमचे स्वतःचे आहे, ते तुम्हांला कोण देईल? कोणत्याही दासाला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही. तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्हांला देवाची व धनाची सेवाचाकरी करता येणार नाही.”

सामायिक करा
लूक 16 वाचा

लूक 16:10-13

लूक 16:10-13 MARVBSIलूक 16:10-13 MARVBSIलूक 16:10-13 MARVBSIलूक 16:10-13 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा