YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 7:1-6

मत्तय 7:1-6 MACLBSI

तुमचा न्याय केला जाऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नका. ज्या न्यायानुसार तुम्ही न्याय कराल त्यानुसार तुमचा न्याय केला जाईल. ज्या मापाने तुम्ही मोजून द्याल, त्याच मापाने तुम्हांला मोजून दिले जाईल. तू तुझ्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न घेता तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा ‘तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे’, असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढायला तुला स्पष्ट दिसेल. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका. तुमचे मोती डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर कदाचित त्यांच्या पायांखाली ती तुडवतील व उलटून तुमच्या अंगावर धावून येतील.