YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 7:1-6

मत्तय 7:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

इतरांचे दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष काढण्यात येणार नाहीत. कारण ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढता त्याच न्यायाने तुमचेही दोष काढले जातील आणि ज्या मापाने तुम्ही मोजून देता त्याच मापाने तुम्हास परत मोजून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? अथवा ‘तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या स्वतःच्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळयांतले कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्टपणे पाहता येईल. जे पवित्र आहे ते कुत्र्यांना टाकू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर कदाचित ती त्यांना पायदळी तुडवतील व नंतर ती उलटून येवून तुम्हासही फाडतील.

सामायिक करा
मत्तय 7 वाचा

मत्तय 7:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“इतरांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय कराल, त्याच पद्धतीने तुमचाही न्याय करण्यात येईल, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. “आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? सर्व वेळ स्वतःच्या डोळ्यामध्ये मुसळ असताना, ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणू शकतोस? अरे ढोंगी माणसा! पहिल्याने तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ, मग तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्ट दिसेल. “जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका. जर टाकले तर ते कदाचित आपल्या पायाखाली तुडवतील आणि फाडून तुमचे तुकडे करतील.

सामायिक करा
मत्तय 7 वाचा

मत्तय 7:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर ती कदाचित आपल्या पायांखाली ते तुडवतील व उलटून तुम्हांला फाडतील.

सामायिक करा
मत्तय 7 वाचा

मत्तय 7:1-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तुमचा न्याय केला जाऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नका. ज्या न्यायानुसार तुम्ही न्याय कराल त्यानुसार तुमचा न्याय केला जाईल. ज्या मापाने तुम्ही मोजून द्याल, त्याच मापाने तुम्हांला मोजून दिले जाईल. तू तुझ्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न घेता तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा ‘तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे’, असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढायला तुला स्पष्ट दिसेल. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका. तुमचे मोती डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर कदाचित त्यांच्या पायांखाली ती तुडवतील व उलटून तुमच्या अंगावर धावून येतील.

सामायिक करा
मत्तय 7 वाचा

मत्तय 7:1-6

मत्तय 7:1-6 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा