Logo YouVersion
Icona Cerca

गणना 34

34
कनान देशाच्या सीमा
1याहवेह मोशेला म्हणाले, 2“इस्राएली लोकांस आज्ञा देऊन सांग: ‘जो देश तुम्हाला तुमचे वतन म्हणून दिला जाणार आहे त्या कनान देशात जेव्हा तुम्ही प्रवेश कराल तेव्हा त्याच्या सीमा अशाप्रकारे असाव्यात:
3“ ‘तुमच्या दक्षिणेचा विभाग सीन रानाच्या काही भागापासून एदोमाच्या सीमेपर्यंत असावा. तुमची दक्षिणेची सीमा मृत समुद्राच्या पूर्वेच्या टोकाकडून असावी, 4तिथून तुमची सीमा अक्राब्बीमच्या#34:4 अक्राब्बीम अर्थात् विंचू चढावाच्या दक्षिणेस पोचून तिथून ती पुढे सीन पर्यंत जाऊन कादेश-बरनेआच्या दक्षिणेपर्यंत आणि हाजार अद्दारपर्यंत जाऊन आजमोनास पोचावी. 5आजमोनाहून ती सीमा वळून इजिप्त देशाच्या ओहोळाला जाऊन मिळेल व भूमध्य समुद्राकडे संपेल.
6तुमची पश्चिमेकडील सीमा भूमध्य समुद्राचा किनारा असेल. ही तुमची पश्चिम सीमा असावी.
7तुमच्या उत्तरेकडील सीमेसाठी भूमध्य समुद्रापासून होर पर्वतापर्यंत रेखा आखावी. 8आणि होर पर्वतापासून लेबो हमाथपर्यंत व तिथून ती सीमा जेदादपर्यंत न्यावी. 9जिफरोनपर्यंत जाऊन तिचा शेवट हाजार-एनान येथे संपेल. ही तुमची उत्तरेकडील सीमा असेल.
10तुमच्या पूर्वेकडील सीमेसाठी हाजार-एनानपासून शेफम पर्यंत रेखा आखावी. 11तिथून ती सीमा शेफमपासून खाली रिब्लाह जे एईनच्या पूर्वेकडे आहे तिथपर्यंत जाईल आणि उताराला पुढे पूर्वेच्या बाजूने किन्नेरेथ#34:11 इब्री भाषेत गालील समुद्रापर्यंत पोहोचेल. 12नंतर ती सीमा यार्देन नदीच्या कडेने जाऊन मृत समुद्राकडे तिचा शेवट होईल.’
“ ‘प्रत्येक दिशेने त्याच्या सीमा असलेला हाच तुमचा देश असेल.’ ”
13मोशेने इस्राएली लोकांना ही आज्ञा दिली: “हा देश तुम्ही चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून वाटप करावा. याहवेहने आज्ञा केली आहे की हा देश साडेनऊ गोत्रांना दिला जावा, 14कारण रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राच्या कुटुंबांना त्यांचे वतन मिळाले आहे. 15या अडीच गोत्रांना त्यांचे वतन यरीहोजवळ, यार्देनच्या अलीकडे पूर्वेच्या बाजूला मिळाले आहे.”
16याहवेह मोशेला म्हणाले, 17“ज्या पुरुषांनी देश वतन म्हणून तुम्हाला वाटप करून द्यावा ते हे आहेत: एलअज़ार याजक आणि नूनाचा पुत्र यहोशुआ. 18आणि देश वाटणीच्या मदतीसाठी प्रत्येक गोत्रातून एक पुढारी नेमावा.
19“ही त्यांची नावे आहेत:
“यहूदाहच्या गोत्रातून, यफुन्नेहचा पुत्र कालेब;
20शिमओनच्या गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र शमुवेल;
21बिन्यामीनच्या गोत्रातून, किसलोनचा पुत्र एलीदाद;
22दानच्या गोत्रातून, योगलीचा पुत्र बुक्की हा पुढारी होता.
23योसेफाचा पुत्र मनश्शेह याच्या गोत्रातून, एफोदचा पुत्र हन्नीऐल हा पुढारी होता.
24योसेफाचा पुत्र एफ्राईम याच्या गोत्रातून, शिफतनचा पुत्र कमुवेल हा पुढारी होता.
25जबुलूनच्या गोत्रातून, परनाखचा पुत्र एलीजाफान हा पुढारी होता.
26इस्साखारच्या गोत्रातून, अज्जानचा पुत्र पलतीएल हा पुढारी होता.
27आशेरच्या गोत्रातून, शलोमीचा पुत्र अहिहूद हा पुढारी होता.
28नफताली गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र पेदेहेल हा पुढारी होता.”
29इस्राएली लोकांना कनान देशात वतन वाटून देण्यासाठी याहवेहने ज्या पुरुषांना आज्ञा दिली ते हे आहेत.

Attualmente Selezionati:

गणना 34: MRCV

Evidenzia

Copia

Confronta

Condividi

None

Vuoi avere le tue evidenziazioni salvate su tutti i tuoi dispositivi?Iscriviti o accedi